शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 19 सप्टेंबर 2018 (15:37 IST)

कॉमेडी सर्कस पुन्हा एकदा सुरु

कॉमेडी सर्कस या शोने चार वर्षापूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. मात्र आता हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसविण्यासाठी सज्ज झाला आहे. १५ सप्टेंबरपासून हा शो सुरु झाला असून पहिल्याच दिवशी या कार्यक्रमाने प्रेक्षकांना खळखळून हसविलं आहे. या शोमध्ये अर्चना पूरन सिंह आणि अभिनेता सोहेल खान परिक्षकाची भूमिका पार पाडणार आहे. तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जोआना रोबाक्झ्वेस्का करणार आहे.
 
हा कार्यक्रम शनिवार आणि रविवारी रात्री ९.३० वाजता प्रसारित होणार असून या शोमध्ये अनिता हसनंदानी, आदिती भाटिया, मुबीन सौदागर, सिद्धार्थ सागर, करिश्मा शर्मा, ओजस्वी ओबेरॉय आणि केतन सिंह ही कलाकार मंडळी प्रेक्षकांना हसविणार आहे. या कार्यक्रमामुळे कलाविश्वाला कपिल शर्मा, राजू श्रीवास्तव, सुनील ग्रोवर हे विनोदवीर लाभले आहेत.