1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

ठग्स ऑफ हिंदोस्तान येत्या ८ नोव्हेंबरला भेटीला येणार

The Thugs of Hindostan
ठग्स ऑफ हिंदोस्तान हा चित्रपट येत्या ८ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या टीमने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. 
 
ठग्स ऑफ हिंदोस्तान हा चित्रपट लार्जर दॅन लाइफ असावा यासाठी यशराज फिल्म्स प्रोडक्शन प्रचंड प्रयत्न करत आहे. अमिताभ बच्चन आणि आमिर खान या दोन दिग्गज कलाकारांना या चित्रपटाद्वारे यश राजने एकत्र आणले आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर ऐवजी या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या लवकरच भेटीस येणार आहे. या मोशन पिक्चरद्वारे चित्रपटातील महत्त्वाच्या व्यक्तिरेखांची ओळख प्रेक्षकांना करून दिली जाणार आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेचे वेगळे पोस्टर असून ते वेगवेगळ्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीस येईल असे म्हटले जात आहे. या चित्रपटातील फँटसी, अॅक्शन हे प्रेक्षकांना खरेखुरे वाटावे यासाठी चित्रपटाच्या टीमने प्रयत्न केले आहेत