फिल्मी टीचर
आधीच्या सिनेमात मास्तरांची भूमिका असली तर ती अत्यंत सरळ- साधी आणि कमजोर व्यक्तीच्या रूपात प्रस्तुत करण्यात येत होती. परंतु हल्लीच्या काळात चित्र थोडे बदले आहे. आता ते बॉलीवूडचे फिल्मी टीचर स्मार्ट, ग्लॅमर्स किंवा कधीकधी फनी असतात पण सर्वांचे हृदय जिंकणारे असतात. चला बघू असेच काही फिल्मी टीचर ज्यांनी आपल्या भूमिकेने वेगळीच छाप सोडली आहे.
अमिताभ बच्चन
अमिताभ यांनी अनेक चित्रपटांमध्ये शिक्षक म्हणून भूमिका साकारली आहे. मोहब्बतें, मेजर साब, कस्मे वादे व इतर. पण त्यांनी सर्वात छान भूमिका साकारली ब्लॅक या सिनेमात. देबराज सहायच्या भूमिकेत अमिताभने अंधळी- मुकी आणि बहिरी मुलगी मिशेलला शिक्षित करण्याची जबाबदारी किती कठिण प्रसंग झेलून पार पडली दर्शवण्यात आले होते. अश्या शिक्षकाला सलाम.
आमिर खान
‘तारे जमीं पर’ सिनेमातील आमिर खानने सगळ्यांच्या हृदयात वेगळीच छाप सोडली. ज्यात त्याचे काम केवळ शिकवणे नसून विद्यार्थ्यांना समजणे होते. आपल्या विद्यार्थ्याच्या समस्येचा मूळ शोधून तो त्यापासून त्याला बाहेर काढतो आणि त्यांचे गुण शोधून त्याच्या व्यक्तिमत्त्वाला नवीन दिशा देतो.
बोमन इराणी
बोमनने नेहमी फनी भूमिका साकारून लोकांचे मन जिंकले. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ मध्ये अष्ठानाच्या रूपात बोमनने स्तुत्य भूमिका साकारली होती. तसेच ‘3 इडियट्स’ मध्येही बोमन प्रिंसिपलच्या रूपात एक कडक व्यक्ती म्हणून दिसले होते.
सुष्मिता सेन
‘मैं हूँ ना’ मध्ये सुष्मिता सेनला एक ग्लॅमर्स भूमिकेत दर्शवले होते. ती क्लासमध्ये आल्यावर विद्यार्थ्यांच्या हृदयाची गती थांबायची. या सिनेमातील इतर सर्व शिक्षक वेंधळेच दर्शवण्यात आले होते.
गायत्री जोशी
गायत्री जोशीने चित्रपट ‘स्वदेस’ यात एक आदर्श शिक्षिकाची भूमिका साकारली होती. साधी-भोळी आपल्या मातृभूमीला प्रेम करणारी ही भूमिका जीवनाच्या खूप जवळीक होती.