सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. शिक्षक दिन
Written By
Last Updated : मंगळवार, 3 सप्टेंबर 2019 (14:24 IST)

डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे मौल्यवान विचार

पुस्तकं या माध्यमाने आम्ही दोन संस्कृतींमध्ये पूल तयार करू शकतो. 
केवळ निर्मळ मन असलेला व्यक्तीच जीवनाचं आध्यात्मिक अर्थ समजू शकतो. स्वत:शी प्रामाणिकपणा आध्यात्मिक अखंडतेसाठी अनिवार्य आहे.
वयाचे काळाशी काही संबंध नाही. आम्ही तेवढेच युवा किंवा वयस्कर आहोत जेवढे आम्ही स्वत:ला समजतो.
लोकतंत्र केवळ विशेष लोकांसाठी नव्हे तर प्रत्येक मनुष्याच्या आध्यात्मिक संभाव्यामध्ये एक विश्वास आहे.
एक साहित्यिक प्रतिभा प्रत्येकासारखी दिसते परंतू त्यासारखे कुणीही दिसत नाही.
आम्हाला माणुसकीला त्या नैतिक मुळापर्यंत परत घेऊन जाण्याची गरज आहे जिथे शिस्त आणि स्वातंत्र्य दोघांचे उद्गम असेल.
शिक्षणाचा परिणाम ऐतिहासिक परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्ती विरुद्ध लढा देणारा एक मुक्त रचनात्मक व्यक्ती असावा.
पुस्तक वाचन आम्हाला एकट्यात विचार करण्याची सवय आणि सुख प्रदान करतं.
जर मनुष्य राक्षस बनून जातो तर हे त्याचे पराभव आहे आणि मनुष्य महान माणूस बनल्यास चमत्कार. तसेच मनुष्य मनुष्य बनला तरी हा त्याचा विजय आहे.
मनुष्याची प्रकृती स्वाभाविक रूपात चांगली आहे आणि ज्ञानाचा प्रसार केल्याने सर्व वाईट गोष्टींचा अंत होईल.
मनुष्याला केवळ तांत्रिक कार्यक्षमता नाही तर आत्म्याची महानता प्राप्त करण्याची गरज आहे.
धन, शक्ती आणि क्षमता केवळ जीवनाचे माध्यम आहे स्वत: जीवन नाही.
केवळ ज्ञान आणि विज्ञानाच्या आधारावर सुखी आणि आनंदी जीवन शक्य आहे.
व्यवस्था आणि स्वातंत्र्य कायम ठेवण्यासाठी आम्हाला मानवतेचे नैतिक मूळ लक्षात ठेवायला हवे.
आध्यात्मिक जीवन भारताची प्रतिभा आहे.
मृत्यू कधीही शेवट किंवा अडथळा नसून एक नवीन सुरुवात आहे.