गुरूवार, 28 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 9 ऑगस्ट 2018 (09:06 IST)

आठवडाभर तमिळ चित्रपटाचे रिलीज होणारे नाही

m karunanidhi
एम. करुणानिधी यांच्‍या निधनानंतर तामिळनाडूत रिलीज होणारे तमिळ चित्रपट रद्‍द करण्‍यात आले आहेत. चित्रपटांबरोबरच सिनेसृष्‍टीतील इतर कार्यक्रम आठवडाभर होणार नाहीत. तमिळ थिएटर्स असोसिएशनने देखील मंगळवार सायंकाळपासूनच पुढील आठवड्‍यापर्यंत शो रद्‍द केले आहेत. ही माहिती ट्रेड ॲनालिस्ट रमेश बाला यांनी ट्विटरवर पोस्ट करत दिली आहे. 
 
रमेश बाला यांनी आणखी एक ट्‍विट करत म्‍हटलं आहे की, पुढचा एक आठवडा तमिळ सिनेमांशी संबंधित कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत. तसेच दक्षिण तामिळनाडूच्‍या खासगी बस ऑपरेटर्सनी तूतीकोरिन, तिरुनेलवेली आणि कन्याकुमारी ते चेन्नई जाणार्‍या लांब पल्‍ल्‍याच्‍या बसेस बंद ठेवण्‍याचा निर्णय घेतला आहे.