रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

माजी केंद्रीय मंत्री प्रियरंजन दासमुन्शी यांचे निधन

ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रियरंजन दासमुन्शी (७२) यांचे सोमवारी नवी दिल्लीतील खासगी रुग्णालयात निधन झाले.त्यांच्या मागे पत्नी व काँग्रेस नेत्या दीपा दासमुन्शी आणि मुलगा प्रियदीप हे आहेत.
 
दासमुन्शी यांना २००८ मध्ये पक्षाघाताचा मोठा झटका आला होता, यादरम्यान ते कोमात गेले. त्यानंतर २००९ पासून त्यांच्यावर नवी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या महिन्यांत त्यांच्या छातीत संसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. 
 
प्रियरंजन दासमुन्शी हे पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. त्याचबरोबर ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे ते माजी अध्यक्ष राहिले आहेत. सुमारे दोन दशके ते या पदावर कार्यरत होते. पश्चिम बंगालचे स्ट्राँगमॅन म्हणूनही त्यांची ख्याती होती. १९९९ पासून पश्चिम बंगालच्या रायगंज मतदारसंघाचे त्यांनी नेतृत्व केले. आघाडी सरकारच्या काळात पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी माहिती व प्रसारण मंत्रालयाचा कारभार पाहिला.