बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

काँग्रेस आणि पाटीदार आंदोलकांमध्ये हाणामारी

सुरतमध्ये काँग्रेस आणि पाटीदार आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. काँग्रेसने रविवारी रात्री ७७ उमेदवारांची यादी जाहीर केल्याने पाटीदार समितीचे कार्यकर्ते नाराज असून सुरतमधील काँग्रेस कार्यालयात काम होऊ देणार नाही असा इशाराच पाटीदार समितीने दिला आहे. त्यामुळे आता हार्दिक पटेल पाठिंबा जाहीर करणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
गुजरातमध्ये सत्तेवर आल्यास पटेलांना आरक्षण देण्याबाबत काँग्रेस आणि हार्दिक पटेल यांच्या पाटीदार अनामत आंदोलन समितीमध्ये (पास) एकमत झाल्याची घोषणा रविवारी करण्यात आली. या आरक्षणाबाबतचे तपशील आणि निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देण्याबाबत ‘पास’ची भूमिका यासंदर्भात हार्दिक पटेल राजकोटमधील सभेत घोषणा करतील असेही ‘पास’चे संयोजक दिनेश भंभानिया यांनी सांगितले होते. मात्र रविवारी रात्री काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी ७७ उमेदवारांची यादी जाहीर केली.  यातून वादाची ठिणगी पडली.