रविवार, 7 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

गुजरात निवडणुका : भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर

BJP releases first list of candidates for Gujarat elections
गुजरात येथे भाजपा विरुद्ध कॉंग्रेस अशी चुरशीची होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची भाजपा ने पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. या  यादीत भाजपने 70 उमेदवारांची नावे जाहीर केली असून,  मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले विजय रुपाणी यांचे नाव देखील समाविष्ट आहे.

रूपानी हे पश्चिम राजकोटमधून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे आता निवडणुकीला खरा रंग चढणार आहे. जर आपण पहिली  जाहीर झाली ती पहिली तर यामध्ये  नितीनभाई पटेल यांना मेहसानामधून उमेदवारी दिली आहे. यामध्ये त्यानंतर जितूभाई वाघाणी यांनी भावनगर पश्चिमची उमेदवारी देण्यात आली आहे. यामध्ये कोणालाही न डावलता जे विद्यमान आमदार आहेत त्यांचा समावेश करण्यात आला आहे.

हार्दिक पटेलची लाट पाहता त्याला जोरदार टक्कर देण्यासाठी  पटेल  समाजाच्या 13 उमेदवारांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीमध्ये जे  काँग्रेसमधून सोडून भाजपात आले आहेत त्यांचा  पाच नावांचाही समावेश करण्यात आला आहे. या आगोदर झालेल्या भाजपा बैठकीत १८२ उमेदवार निश्चित करण्यात आली होती.