बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 18 नोव्हेंबर 2017 (16:21 IST)

फ्रोझन एग्ज मदतीने डायना हेडन जुळ्यांना जन्म देणार

माजी मिस इंडिया डायना हेडन दुसऱ्यांदा 44 वर्षीय जुळ्यांना जन्म देणार आहे. तीन वर्षांपूर्वी जतन केलेल्या बीजाच्या माध्यमातून (फ्रोझन एग्ज) ती हा जन्म देणार आहे.  याआधी जानेवारी 2016 मध्येही तिने फ्रोझन एग्ज पद्धतीनेच पहिल्या बाळाला जन्म दिला होता. त्यावेळी, आठ वर्षांपूर्वी जतन केलेल्या बीजातून तिला अपत्य प्राप्ती झाली होती.

गेल्या काही वर्षांत अप्रत्यप्राप्तीच्या पद्धती कशा आधुनिक झाल्या आहेत, हे यातून दिसून येत असल्याचं डायनाच्या डॉक्टर असलेल्या आयव्हीएफ डॉ. नंदिता पालशेतकर यांनी सांगितलं.

चाळिसाव्या वर्षी डायना कॉलिन डिकच्या प्रेमात पडली. त्यावेळी आपल्याला एंडोमेट्रिओसिस असल्याचं तिला समजलं. अशावेळी महिलांना गर्भधारणेत अडथळे येऊ शकतात. त्यामुळे टेस्ट ट्यूब बेबीसाठी तिने बीज गोठवण्याचा निर्णय घेतला.