मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नाशिक , बुधवार, 9 मे 2018 (12:00 IST)

हृदयविकाराच्या झटक्याने बिपीन गांधी यांचे निधन

रेल परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी (वय ६५) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पंचवटी एक्स्प्रेसच्या २१ डब्यांच्या नवीन गाडीच्या स्वागतासाठी ते नाशिकरोड रेल्वे स्थानकात आले होते. तेथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
 
रेल्वे प्रवाशांसाठी झटणाऱ्या बिपीन गांधी यांनी ‘आदर्श – पंचवटी एक्सप्रेस’सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आजपासून ही गाडी प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. मात्र ही एक्स्प्रेस नाशिक रोड रेल्वे स्थानकात येण्याच्या पाच मिनिटं आधीच बिपीन गांधी यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.