शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मागोवा 2018
Written By

37 वर्ष लहान जसलीनबरोबर रोमांस करणारे अनूप जलोटा तीनदा विवाहित

बिग बॉस सीझन 12 ची धमाकेदार सुरुवात झाली जेव्हा प्रसिद्ध भजन गायक अनूप जलोटा यांनी धक्कादायक खुलासा केला की ते वयाहून 37 वर्ष लहान जसलीन मथारू हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. जसलीन आणि अनूप बिग बॉस 12 मध्ये भाग घेत आहे. 
 
ऑल इंडिया रेडिओवर कोरस सिंगर या रूपात करिअर सुरू करणारे अनूप यांनी भजन गात खूप प्रसिद्धी मिळवली आणि त्यांचे अनेक भजन हिट आहे. तसेच त्यांची पर्सनल लाईफ खूप चर्चेत होती आणि त्यांचे तीनदा विवाह झालेले आहे.
 
पहिली पत्नी
अनूप यांचे पहिले विवाह सोनाली शेठ नावाच्या गुजराती मुलीशी झाले होते. कुटुंबाविरुद्ध हे लग्न झाले. सोनाली अनूप यांच्याकडे गाणं शिकत होती. दोघांनी 'अनूप ऍड सोनाली जलोटा' नावाने खूप कंटर्सट केले, नंतर ते वेगळे झाले.
 
दुसरी पत्नी
बीना भाटिया नावाच्या महिलेसोबत अनूप यांनी अरैंज मैरिज केली होती. हे लग्न टिकले नाही आणि लवकरच घटस्फोट झाला. 
 
तिसरी पत्नी
तिसरं विवाह मेधा गुजराल हिच्यासोबत केले. मेधा भारताचे माजी पंतप्रधान आयके गुजराल यांची पुतणी होती. मेधा फिल्म दिग्दर्शक शेखर कपूर यांची पहिली पत्नी होती. 1996 साली मेधा आणि अनूप यांच्या घरी मुलाचा जन्म झाला. 25 नोव्हेंबर 
 
2014 साली न्यूयॉर्क मध्ये लिव्हर फेल झाल्यामुळे मेधाचा मृत्यू झाला होता.