गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 19 सप्टेंबर 2018 (00:02 IST)

बच्चन यांचा 'ठग' चा लूक रिलीज

thugs of hindustan amitabh bachchan
'ठग्स ऑफ हिंदुस्तान' या सिनेमातील अमिताभ बच्चन यांचा 'ठग' चा लूक रिलीज झाला आहे. या सिनेमाच्या पहिल्याच दिवसापासून सोशल मीडियावर अमिताभ आणि आमिर यांच्या शुटिंगचे फोटो, व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. आतापर्यंत या दोघांचे अनेक लूक व्हायरल झाले पण कालांतराने हे लूक खोटे असल्याचं समजतं. पण अखेर अमिताभ बच्चन यांचा 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' मधील लूक व्हायरल झाला आहे. अमिताभ बच्चन 'खुदाबक्श' या कॅरेक्टरमध्ये दिसत आहे. या लूकमध्ये बिग बी एका जहाजावर उभे असल्याच दिसत आहे. हे मोशन पोस्टर खूप पसंतीला पडत आहे. हा सिनेमा 1839 मध्ये 'कंफेशन्स ऑफ ए ठग'वर आधारित आहे. सिनेमा 8 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.