शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 18 सप्टेंबर 2018 (12:49 IST)

विमानतळावर सनीचा भन्नाट भांगडा

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी चित्रपटांपेक्षा अधिक सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहे. सनी सर्रास आपल्या सोशल अकाऊंटवर असे काही व्हिडिओ शेअर करते की, ते व्हायरल व्हायला जराही वेळ लागत नाही. असाच एक नवा व्हिडिओ सनीने शेअर केला आणि काहीच तासांत तो व्हायरल झाला. या व्हिडिओची खास बात म्हणजे, तो मुंबई विमानतळावरचा आहे. मुंबई विमानतळाच्या जेट ब्रिजवर सनी आपल्या टीमसोबत उभी आहे. या व्हिडिओत सनी व तिची टीम सिंगींग सुपरस्टार दलेर मेहंदी यांच्या  'बोलो तारा रारा' गाण्यावर थिरकताना दिसतेय. या व्हिडिओला आतापर्यंत 20 लाखांवर लोकांनी पाहिले आहे. 
 
मी आणि माझी टीम कुठलाही वेडेपणा करू शकतो, असे सनीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.