बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018 (00:15 IST)

चेहराच तुमचा बोर्डिंग पास

बंगळुरू विमानतळावर नवीन, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊन, जिथे बोर्डिंग पासद्वारे यात्रेकरूचे नाव, तो प्रवासास जात असलेले ठिकाण, विमान सुटण्याची वेळ, बोर्डिंग गेट इत्यादी माहिती उपलब्ध होत असे, तिथे आता ही सर्व प्रक्रिया 'बायोमेट्रिक सेल्फ बोर्डिंग टेक्नोलॉजी' चा वापर करून करण्यात येणार आहे. त्यामुळे आता ही प्रक्रिया संपूर्णपणे 'पेपरलेस' असणारा बंगळुरू भारतातील पहिलाच विमानतळ ठरणार आहे. बायोमेट्रिक सेल्फ बोर्डिंग टेक्नोलॉजीच्या वापरामुळे 'यात्रेकरूचा चेहराच त्याचा बोर्डिंग पास' असणार आहे. बंगळुरू इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड, बंगळुरू विमानतळ व्यवस्थापन आणि 'व्हिजनबॉक्स' यांच्यामध्ये यासंबंधी करार झाला असून, या द्वारे लवकरच बायोमेट्रिक स्लेफ बोर्डिंग सिस्टमचा वापर करीत, बोर्डिंग प्रक्रिया संपूर्णपणे 'पेपरलेस', म्हणजेच बोर्डिंग पास किंवा तत्सम कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांच्या वापराविना केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या उपक्रमाचा पहिला टप्पा 2019 सालच्या मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, यामध्ये जेट एअरवेज, एअर एशिया आणि स्पाइस जेट या विमानसेवांच्यामर्फत प्रवास करणार्‍या यात्रेकरूंना सर्वप्रथम पहिल्या टप्प्यामध्ये या उपक्रमाचा लाभ घेता येणार आहे. या विमानतळावर लवकरच आणण्यात येणारी बायोमेट्रिक सेल्फ बोर्डिंग टेक्नोलॉजी अतिशय आधुनिक असून, यामुळे विमानप्रवासाच्या दरम्यान रजिस्ट्रेशनपासून ते विमानांमध्ये बोर्डिंग होईपर्यंत सर्वच प्रक्रिया ऑटोमेटेड आणि अतिशय सोयीची होणार असल्याचे सांगण्यात आले.