1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
  4. Jio phone, phone 2 customers will now watch YouTube videos

जिओ फोन, जिओ फोन २ ग्राहक आता यूट्यूब व्हिडीओ पाहणार

Jio Phone आणि Jio Phone 2 च्या ग्राहक आता यूट्यूब व्हिडीओ देखील पाहू शकणार आहेत. याआधी रिलायन्स जिओने, जिओ फोन, जिओ फोन २ ग्राहकांसाठी १० सप्टेंबरपर्यंत व्हॉटसअॅप दिलं आहे. तसेच २० सप्टेंबरपर्यंत हे सर्व फोनमध्ये देखील उपलब्ध होईल. जिओ फोन वापरणारे ग्राहक १९ सप्टेंबरपासून यूट्यूब व्हिडीओचा आनंद घेऊ शकतील. या जिओ फोनच्या अॅपस्टोअरवर तो डाऊनलोड करता येणार आहे. 
 
जिओ फोनमध्ये व्हॉटसअॅप डाऊनलोड करण्यासाठी, सर्वात आधी फोनच्या मेन्यू ऑप्शनमध्ये जा, यानंतर App Store सर्च करा. अॅपस्टोअरवर क्लिक करा, तेथे यूट्यूब सर्च करा. यानंतर त्याला डाऊनलोड करा. एकावेळा डाऊनलोड केल्यानंतर मनासारखे व्हिडीओ पाहू शकता.
पुढील लेख
लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपींची राष्ट्रीय रजिस्ट्री तयार