मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

जिओफोन बनला भारतातील सर्वाधिक विक्री होणारा फोन

मुंबई- प्रत्येक भारतीयाला डेटाशक्ती मिळून तो सक्षम व्हावा आणि त्याने जादुई गोष्टी कराव्यात या हेतूने दोन वर्षांपूर्वी जिओ सुरू झाले. दोन वर्षांपेक्षा कमी काळात जिओने सव्वादोन कोटींहून अधिक ग्राहक जोडले आहेत.
मोठ्या प्रमाणात 4 जी स्मार्टफोन यूजर्स जिओकडे वळाले असून, अतिशय कमी दरात ते जागतिक दर्जाची सेवा मिळवत आहेत. फीचरफोनचा वापर करणारा वर्ग, ज्याची संख्या भारतातील एकूण मोबाईल यूजर्सच्या दोन तृतीयांश आहे. हा वर्ग इंटरनेट सेवेपासून दूरच होता. 
सेवा परवडण्याजोगी झाली तरी हे ५० कोटी मोबाईल यूजर्स प्राथमिक पातळीवरील 4जी स्मार्टफोन खरेदी करू शकत नव्हते. यातूनच जिओफोनचा जन्म झाला आणि रिलायन्स रिटेलने ऑगस्ट २०१७ मध्ये तो सादर केला. 
 
जिओफोनची आश्वासने : 
१. परवडण्याजोगे उपकरण : मॉन्सून हंगामा ऑफरमध्ये जिओफोन केवळ ५०१ रुपयांमध्ये मिळणार आहे. यामुळे तो शंभर टक्के यूजर्सना वापरण्यास परवडेल. 
२. स्वस्त दरात जागतिक दर्जाची सेवा : जगात सर्वांत कमी दराने जिओ उत्कृष्ट डेटा आणि एचडी कॉलिंग सुविधा देत आहे. यात जिओफोन यूजर्ससाठी खास आकर्षक ऑफरही आहेत. 
३. उत्कृष्ट अॅप्लिकेशन्स : जिओफोन यूजर्स आधीपासूनच जिओ टीव्ही, जिओसिनेमा, जिओ म्युझिक, जिओचॅट, गुगल मॅप्स , फेसबुक यासाखी प्रिमियम अॅप्लिकेशन्स वापरत आहेत.
४. डिजिटल स्वातंत्र्य : इतर कोणत्याही हायएंड 4 जी स्मार्टफोन यूजरप्रमाणे जिओ फोन यूजर मनोरंजन,  शिक्षण, माहिती आणि इतर सेवा त्यांच्या मनाप्रमाणे मिळवू शकतात. 
 
याविषयी बोलताना रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे संचालक आकाश अंबानी म्हणाले, '' आतापर्यंत ज्यांच्याशी जोडलो गेलो नव्हतो, त्यांचाशी जोडले जाताना अनेक भागीदार पुढे आले आणि यासाठी मदत केली. आमच्यासोबत पहिल्यापासून राहिलेला एक भागीदार आहे फेसबुक आणि त्यांची इकोसिस्टिम. या भागीदारीचे फलित आज जगासमोर आहे. जगातील सर्वाधिक वापरले जाणारे चॅट अॅप्लिकेशन व्हॉट्सअप आम्ही आजपासून सर्व जिओफोनवर देत आहोत. हे प्रत्यक्षात येण्यासाठी मदत केल्याबद्दल फेसबुक आणि व्हॉट्सअॅप टीमचे जिओकडून आभार.''
सर्व चाचण्या पार पडल्यानंतर प्रथमच भारतात जिओफोनवर  व्हॉट्सअॅपवर उपलब्ध होत आहे. व्हॉट्सअॅपने जिओफोनसाठी अॅपची नवी आवृत्ती तयार केली आहे. 'जिओ कायओएस'वर ते चालत असून, ग्राहकांना मित्र आणि कुटुंबीयांशी संवाद साधण्याचा सोपा, विश्वासू आणि सुरक्षित मार्ग खुला होणार आहे. 
नव्या अॅपमध्ये व्हॉट्सअॅपवरील जलद आणि भरवशाची संदेश सेवा मिळेल तसेच , फोटो आणि व्हिडिओ  पाठवता येतील. कीबोर्डवर केवळ टॅप करून व्हॉईस मेसेज पाठवता येईल. व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी जिओफोन यूजरला त्याचा क्रमांक व्हेरीफाई करावा लागेल. त्यानंतर लगेचच त्याला व्हॉट्सअॅप चॅट सुरु करता येईल. 
याबाबत बोलताना व्हॉट्सअॅपचे उपाध्यक्ष ख्रिस डॅनियल्स म्हणाले , '' भारतात कोट्यवधी जिओफोन ग्राहक आता व्हॉट्सअॅप वापरू शकणार आहेत. 'कायओएस' साठी तयार केलेल्या या नव्या अॅपमुळे भारतात आणि जगात लोकांच्या संवाद साधण्याच्या क्षमतेत वाढ होईल."
 
जिओफोन मागील वर्षी बाजारपेठेत सादर झाल्यापासून त्याने गाठलेले महत्वाचे टप्पे : 
१. रिलायन्स रिटेलने सादर केलेला जिओफोन ठरला सर्वाधिक विक्री होणारा फोन
२. दीड हजार रुपयांच्या किंमत टप्प्यात विक्री होणाऱ्या दहा फोनमध्ये आठ जिओफोन
३. जिओ फोनवरील व्हॉईस कमांडचा वापर स्मार्टफोनच्या पाचपट अधिक 
४. प्रत्येक स्मार्टफोन यूजरपेक्षा जिओफोन यूजर अधिक काळ इंटरनेट आणि अॅप्लिकेशनचा वापर करतो
५. जिओफोन यूजर केवळ सेवेशी जोडले गेले नाहीत तर , खऱ्या अर्थाने जिओफोन आणि इंटरनेटचा वापर ते पूर्ण क्षमतेने करीत आहेत.