शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018 (16:18 IST)

100 रुपयांच्या नवीन नोटांचा लिलाव सुरू

भारतीय रिझर्व्ह बँककडून ग्राहकांसाठी 100 रुपयांची नवीन नोट जारी करण्यात आली आहे. या 100 रुपयांच्या नवीन नोटांचा लिलाव सुरू आहे. काही नोटांची तब्बल 666 रुपयांसाठी विक्री केली जात आहे. केवळ एक नोट नाही तर 100 रुपयाच्या नोटांच्या बंडलवरही बोली लावली जात आहे. हा लिलाव सुरू आहे ebay.com साइटवर. ebay.comवर एक यादी जारी करण्यात आली आहे. 100 रुपयाच्या नोटेव्यतिरिक्त येथे भारतीय चलनातील अन्य नोटांचीही विक्री सुरू आहे. 
 
उदाहरणार्थ, यामध्ये अधिकतर 786 क्रमांकाच्या मालिकांमधील नोटांचा समावेश आहे. तर काही नोटांची सुरुवात 0AAनं होत आहे. 0AA नं सुरुवात होणारी 100 रुपयाच्या नवीन नोटांच्या बंडलची तब्बल 245 डॉलर म्हणजेच 18 हजार रुपयांना विक्री होत आहे. 100 रुपयांच्या नवीन-जुन्या नोटांचीही विक्री सुरू आहे, या नोटांची किमत 11.99 डॉलर म्हणजे जवळपास 884.86 रुपये एवढी आहे. 'ईबे डॉट कॉम' वर केवळ 100 रुपयेच नाही तर एक रुपया, 5 रुपये आणि10 रुपयाच्याही नोटांची विक्री होत आहे. यांची विक्री किमतही जास्त आहे.