शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

अॅपल 'त्या' ऐतिहासिक कॉम्प्युटरचा लिलाव करणार

अॅपल कंपनी पहिल्या वहिल्या अॅपल १ या कॉम्प्युटरचा सप्टेंबरमध्ये लिलाव करत आहे. हा कॉम्प्युटर १९७० मध्ये तयार करण्यात आला होता. तो स्वत: स्टीव जॉब्स आणि स्टीव वोज्नियाक यांनी मिळून बनवला होता. त्यावेळी हा कॉम्प्युटर ४६ हजार रुपयांना विकला जातहोता. हाच लॅपटॉप आता लिलावासाठी काढण्यात आला. या लॅपटॉपची किंमत ३ लाख डॉलर म्हणजेच जवळपास २ करोड रुपये इतकी ठरविण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे हा कॉम्प्युटर आजही चालू स्थितीत आहे.
 
१९७६ ते ७७ या कालावधीत जॉब्स आणि वोज्नियाक यांनी साधारण २०० कॉम्प्युटर बनवले. त्यातील आता ६० कॉम्प्युटर चालू अवस्थेत आहेत. लिलाव करण्यात येणाऱ्या पहिल्या कॉम्प्युटरमधील सर्व पार्टस ओरिजनल असल्याचेही अॅपलकडून सांगण्यात आले आहे. या कॉम्प्युटरचे टेस्टींग करत असताना तो ८ तासांसाठी चालविण्यात आला आणि त्यात कोणताही अडथळा आला नाही. याचा किबोर्डही पहिल्यांदा लावण्यात आलेला तोच आहे. हा अॅपल १ कॉम्प्युटर बनविल्यानंतर जॉब्स आणि वोज्नियाक यांना बरेच नाव आणि पैसाही मिळाला.