व्हिस्कीच्या बाटलीला कोट्यावधीची बोली
व्हिस्कीच्या व्होली ग्रेल या दुर्मीळ बाटलीला तब्बल ८.०९ कोटी रूपयांची बोली लागली आहे. त्यामुळे ही बाटली जगातील सर्वात महागडी ठरली आहे. व्होली ग्रेलची ही बाटली १९२६ च्या मॅकलन वॅलेरियो अदामीची व्हिस्की आहे. कलेक्टर्स या खास बाटलीबाबत फार उत्सुकता होती. कारण ही फार दुर्मीळ बाटली आहे.
वालरियो अदामी आणि पीटर ब्लेक नावाच्या दोन पॉप आर्टिस्टने या व्हिस्कीच्या फार लहान एडिशनचं लेबल डिझाइन केलं होतं. ज्यात २४ बॉटल्स होत्या. यातील १२ बॉटल्स ब्लेकने डिझाइन केल्या होत्या. तर १२ अदामीने डिझाइन केल्या होत्या. व्हिस्कीची ही बाटली तब्बल ६० वर्षे जुनी आहे. या व्हिस्कीची निर्मिती १९२६ ते १९८६ दरम्यान करण्यात येत होती