सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 20 ऑक्टोबर 2018 (07:56 IST)

व्हॉट्स अॅपवरील ‘सायलेन्ट मोड’च्याच पुढची पायरी म्हणजे ‘व्हेकेशन मोड’

व्हॉट्स अॅपवर पुन्हा मोठे बदल होणार असून, मागील महिन्यांपासून या ‘व्हेकेशन मोड’फिचरवर काम सुरु केले आहे. अॅपवरील ‘सायलेन्ट मोड’च्याच पुढची पायरी म्हणजे ‘व्हेकेशन मोड’असणार असे स्पष्ट केले आहे. सायलेन्ट मोडवर व्हॉट्स अॅप वापरताना किती मेसेज आले यासंर्भातील नोटीफिकेशन्सचे आकडे व्हॉट्स अॅपच्या आयकॉनवर दिसत नाहीत. मात्र नवीन ‘व्हेकेशन मोड’मध्ये व्हॉट्स अॅप म्यूटवर टाकल्यास येणारे नवीन मेसेजेस अर्काइव्हसमध्ये सेव्ह होती, मात्र त्यावेळी आधीच अर्काइव्हमध्ये सेव्ह असणार आहेत.  सध्या नवीन मेसेजेस आल्यानंतर जुने मेसेजस आपोआपच अनअर्काइव्ह होतात. म्हणजे आता व्हॉट्स अॅप ‘व्हेकेशन मोड’वर असताना नवीन मेसेज आल्यानंतर संग्रहित मेसेजस आपोआप काढले जाणार नाहीत तर हा पर्याय ऐच्छिक असेणार आहे. नोटिफिकेशन सेटिंग्समधून युझर्सला हे फिचर सुरु ठेवायचे की नाही हे देखील  ठरवता येणार आहे. कंपनी लिंक्ड अकाऊण्ट फिचरवही काम सुरु केले आहे. फिचरमुळे युझर्सला त्यांचे व्हॉट्स अॅप अकाऊण्ट इतर अकाऊण्टशी कनेक्ट करता येणार आहे.‘डब्यूएबीटाइन्फो’च्या ट्विटनुसार या फिचरच्या माध्यमातून युझर्सला त्यांच्या फेसबुक अकाऊण्टवरील डेटा रिकव्हर करता येणार आहे.