Marathi Biodata Maker
✕

अर्थसंकल्प 2023 हा निर्मला सीतारामन यांच्यासाठी तारेवरची कसरत आहे का?

Updated: मंगळवार, 31 जानेवारी 2023 (09:07 IST)
 
जीडीपीची स्थिती चांगली असली तरी बेरोजगारीचा दर अद्यापही जास्त आहे. डिसेंबर 2022 मध्ये CMIE ने दिलेल्या आकडेवारीनुसार शहरांमध्ये बेरोजगारीचा दर 10 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
 
विषमतेचा कडेलोट
ऑक्सफॅम ने दिलेल्या आकडेवारीनुसार भारतातल्या 1 टक्के लोकांकडे 40 टक्के मालमत्ता एकवटली आहे. अनेकांनी मात्र त्यांच्या मोजमापाच्या पद्धतीवर आक्षेप नोंदवला आहे.
 
परवडणाऱ्या घरांची मागणी, तसंच उंची कारची मागणी किंवा स्वस्त पर्याय असतानासुद्धा महागाच्या वस्तू घेणे या परिमाणांचा विचार केला असता असं लक्षात आलं की श्रीमंत आणखी श्रीमंत झालेतर गरीब आणखी गरीब झाले आहेत.
 
देशातल्या बहुतांश ग्रामीण भागात ही अस्वस्थता ठळकपणे दिसते.
 
पगारात उशीर
बीबीसीने पश्चिम बंगालच्या पुरुलिया गावाला भेट दिली. तिथे लोक केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या संघर्षात अडकले आहेत. या भागातून जाहीर झालेल्या आकडेवारीत असं समोर आलं आहे की मनरेगा योजनेत 330 मिलियन डॉलर इतकं वेतन येणं अद्याप बाकी आहे.  
 
मनरेगाच्या अंतर्गत सुंदरा आणि आदित्य सरदार या योजनेअंतर्गत गेल्या चार महिन्यांपासून  त्यांच्या खेड्यात तळं खणत आहेत. पगार न मिळाल्याने कर्ज घेऊन खाण्याची वेळ आली आहे तसंच त्यांच्या मुलाला शाळेतून काढावं लागलं असं ते म्हणाले.
 
आदिवासी भागात सुद्धा लोकांनी अशाच प्रकारची व्यथा सांगितली.
 
“केंद्र सरकारने गेल्या एका वर्षापासून मनरेगा योजनेत काम करणाऱ्या एक कोटी लोकांचा पगार थांबवला आहे. आर्थिक स्थिती दयनीय असताना आणि बेरोजगारीची स्थिती भयावह असताना हा प्रकार अतिशय अमानवी आहे. ही वेठबिगारी आहे.” असं चळवळीतले कार्यकर्ते निखिल डे म्हणाले.
 
 पगार मिळायला उशीर फक्त पश्चिम बंगाल मध्ये झालेला नाही. देशभरात 550 मिलियन डॉलर इतका पगार थकला आहे.
 
अर्थतज्ज्ञ जेन ड्रेझ यांनी सरकारच्या सार्वजनिक सुरक्षा योजनेत निधीची तूट असण्याकडे लक्ष वेधलं.
 
“एक काळ असा होता की या योजनांवरचा निधी एकूण जीडीपीच्या एक टक्के होता. आता तो अर्ध्या टक्क्यापेक्षाही कमी आहे.  जर या अर्थसंकल्पात तो 1 टक्क्यापर्यंत आला तर मला फार आनंद होईल, तसंच या योजनेतला भ्रष्टाचार कमी करणंही गरजेचं आहे.” असं ते म्हणाले.
 
 मनरेगा योजनेसाठी गेल्या वर्षापासून निधी कमी करण्यात आला तसंच अन्न, खतांसाठीही कमी खर्चाची तरतूद करण्यात आली. कोव्हिड काळात आधार म्हणून काही पुरवणी तरतुदी करण्यात आल्या होत्या जेणेकरून जागतिक पातळीवर होणाऱ्या घडामोडींचा फटका भारताला बसणार नाही.
 
  निर्मला सीतारामन आता काय करू शकतात?
 मोदी सरकारची तुटीची स्थिती पाहता, अर्थमंत्र्यांना चांगलीच तारेची कसरत करावी लागणार आहे. निम्न आर्थिक स्तरातील लोकांना मदत देणे आणि भांडवली खर्चात वाढ करणं आणि दुसऱ्या बाजूला अर्थसंकल्पातली तूट कमी करणं हे त्यांच्यासमोरचं एक मोठं आवाहन आहे.
 
भारताची सध्याची आर्थिक तूट 6.4 टक्के आहेत. गेल्या दशकात ती 4.45 टक्के होती. गेल्या चार वर्षांत सरकारच्या देय रकमेत जवळजवळ दुपटीने वाढ झाली आहे. अन्नपदार्थ आणि खतांवरचं अनुदान 25 टक्क्याने कमी झालं आहे असं रॉयटर्स ने केलेल्या एका सर्वेक्षणात समोर आलं आहे. कोव्हिड काळातला मोफत अन्नधान्य योजना आता बंद करण्यात आली आहे.
 
चालू खात्यातील वित्तीय तूट हेही एक मोठं आव्हान सरकारसमोर आहे.
 
“ परदेशाकडून मदतीची मागणी, जागतिक गुंतवणूकदारांची भावना, आणि प्रादेशिक  पातळीवर व्यापाराची स्थिती याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. हे चिन्ह फारसं चांगलं नाही.” असं DBS ग्रुपच्या एका सर्वेक्षणात म्हटलं आहे.  
 
आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे स्थानिक पातळीवरच्या मागण्या कमी असतील. रिझर्व्ह बँक सुद्धा फेब्रुवारीत व्याजदर वाढवण्याच्या बेतात आहे.
 
अनेक आव्हानं असतानादेखील भारताने जागतिक पातळीवर चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पापलीकडे सुद्धा सरकारला महत्त्वाच्या घोषणा कराव्या लागणार आहेत आणि आधीच कमी असलेल्या पैशाचा योग्य विनिमय करावा लागणार आहे.

Published By- Priya Dixit 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

छत्रपती संभाजीनगरमध्ये दारूचे पैसे देण्यास नकार दिल्याने मेडिकल दुकानदाराच्या पोटात चाकूने वार

LIVE: महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल! मुंबई-कोकणात उष्णतेचा इशारा

महाराष्ट्राच्या द्रुतगती मार्गांवर लवकरच एअर अॅम्ब्युलन्स सेवा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

इंडिया ब्लॉक आपले आंदोलन सुरूच ठेवणार; सुप्रिया सुळे म्हणाल्या - आम्ही एकत्र आहोत

महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल! मुंबई-कोकणात उष्णतेचा इशारा, १६-१७ ऑक्टोबरला अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता

पुढील लेख
Show comments