शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 मार्च 2021 (15:32 IST)

Bank Locker वापरत असाल तर नक्की वाचा

आपल्या मौल्यवान वस्तू घरात ठेवण्यापेक्षा बँकेच्या लॉकरमध्ये ठेवणे अधिक सुरक्षित समजलं जातं. आपण दागिने किंवा महत्त्वाचे कागद सांभाळून ठेवण्यासाठी बँकेचा लॉकर वापरू शकता. पण कधीही आपल्या बँकेच्या लॉकरमध्ये वस्तू अशाच सोडू नये. अनेक लोक एकदा बँकेत लॉकर घेतल्यावर आणि त्यात मौल्यवान वस्तू ठेवण्यानंतर इतिश्री समजतात. पण लक्षात असावे की भारतीय रिझर्व्ह बँक इतर बँकांना आपले लॉकर रद्द करण्याचा हक्क देते. असे तेव्हा घडू शकतं जेव्हा आपण वर्षांतून एकदाही बँकेत लॉकरसाठी व्हिजिट केली नसेल. जर आपण देखील लॉकर वापरता किंवा बँकेत लॉकर घेऊ इच्छित असाल तर नियम जाणून घ्या- 
 
बँक आपले लॉकर रद्द करेल की नाही हे बँकेच्या जोखमीच्या वर्गीकरणावर आधारित आहे, ज्यात आपले खाते बँकेद्वारे प्रोफाइल केलेले आहे
 
. बँक आपले ग्राहक अनेक घटकांच्या आधारावर उच्च जोखीम, कमी जोखीम किंवा मध्यम जोखीम यासारख्या श्रेण्यांमध्ये ठेवतात. हे इन्कम, सोशल प्रोफाइल, बिझनेस कसे आहे या सारख्या पॅरामीटरवर निर्धारित केलं जातं.
 
बँक लॉकर वाटप करण्यापूर्वी ग्राहकाचे केव्हाईसी केलं जातं. कारण ग्राहक द्वारे बँकेत काय वस्तू ठेवल्या जात आहे हे सांगणे गरजेचं नसतं. या प्रकरणात केव्हाईसी प्रोसेस जरा कठोर असते.
 
कमी जोखीम या श्रेणीत येणार्‍या ग्राहकांना लॉकरचा वापर न करण्यासाठी एक वर्षाहून अधिक काळ मिळू शकतो. अर्थात जर ते एका वर्षापेक्षा अधिक काळापर्यंत लॉकर एकदाही वापरत नसतील तरी त्यांचे लॉकरचे वाटप रद्द केले जाणार नाही. आरबीआयच्या नियमांनुसार बँक केवळ तेव्हाच मीडियम जोखीम असलेल्या ग्राहकांना नोटिस पाठवते जेव्हा त्यांचे खाते तीन वर्षांपेक्षा अधिक काळापर्यंत निष्क्रिय असेल.
 
निष्क्रिय असलेल्या लॉकरवर कार्रवाई करण्यापूर्वी बँकाना खाता ऑपरेट करण्यासाठी ग्राहकांना एक नोटिस पाठवणे आवश्यक असतं. अशात ग्राहकांना दीर्घ कालावधीसाठी निष्क्रिय होण्याचे कारण सांगून लेखी उत्तर पाठवावे लागेल.
 
दीर्घ कालावधीसाठी लॉकर वापरत नसणार्‍या ग्राहकांना नोटिस पाठवलं जातं ज्यात प्रमाणिक कारण सांगणे आवश्यक असतं. जसे की नोकरीत ट्रांसफर किंवा खाताधारक एनआरआय असल्यास. अशा प्रकरणांमध्ये बँक ग्राहकांना खाते ठेवण्यासाठी परवानगी देऊ शकतं. परंतू ग्राहकांनी समाधानकारक उत्तर दिलं नाही तर बँक आपलं खातं रद्द करु शकतं. मग हे लॉकर इतर अर्ज करणार्‍याला वाटप केलं जातं. 
 
म्हणून आवश्यक आहे की वेळोवेळी आपले लॉकर ऑपरेट करत राहावे. तसेच आपल्या वस्तूंची देखरेखीसाठी देखील असे करणे आवश्यक आहे.