Daily Horoscope
✕

लॉकडाऊनमध्ये केवळ एका फोटोने आधार कार्डचा पत्ता बदला, जाणून घ्या माहिती

Updated: बुधवार, 29 एप्रिल 2020 (19:49 IST)
 
आधारासाठी त्याच्या अधिकृत संस्थे UIDAI ने ट्विट करून सांगितले आहे की आपण घरात बसून देखील आपल्या आधार पत्रकामध्ये आपला पत्ता बदलू शकता. या साठी आपल्या जास्त काहीच करावयाचे नाही. फक्त आपल्याला आपला फोटो मोबाइलने काढून त्याला अपलोड करावं लागणार. UIDAI ने आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डल वर एका व्हिडिओद्वारे याची सविस्तर माहिती दिली आहे. त्याला बघून आपल्याला सोप्यारीत्या आपला पत्ता अपलोड करू शकता. 
 
ट्विट मध्ये माहिती दिली : UIDAI ने आपल्या ट्विट मध्ये सांगितले आहे की आपल्या सहाय्यक दस्तऐवजीचे (सर्पोटिंग डाक्युमेंट्स) चे रंगीत फोटो काढून आपल्या फोनने अपलोड करावं. या व्हिडिओमध्ये आपल्या घराचा पत्ता बदलविण्याच्या संदर्भात माहिती दिली आहे. UIDAI ने सांगितल्यानुसार सर्वात आधी https://uidai.gov.in/ वेबसाइटला भेट द्या आणि त्यामध्ये 'Online Address Update' वर क्लिक करावं. आपला पत्ता टाकावा आणि सहाय्यक दस्तऐवजाची कलर स्कॅन फाइल अपलोड करावं. 
 
या प्रक्रियेचे अनुसरण करावं  : आपल्याला आपला ऑनलाईन पत्ता बदलण्यासाठी या https://uidai.gov.in/ संकेत स्थळावर जावे लागणार. त्या नंतर आपल्याला My Adhaar या टॅब वर क्लिक करावे लागेल. 
आता आपल्याला ड्रॉपडाऊनच्या दुसऱ्या टॅब वर Update Your Aadhaar मध्ये जावे लागणार. येथे आपल्याला अजून एक तिसऱ्या ऑप्शनला Update Your Address Online ला क्लिक करावे. 
या नंतर एक नवे पान आपल्या समोर येईल. या पानावर खालील बाजूला Proceed to Update Address वर क्लिक करा. या नंतर आपल्याला आपले आधार नंबर, captcha व्हेरिफिकेशन द्यावे लागतील. असे केल्याने आपल्याकडे ओटीपी नंबर येईल. हा ओटीपी नंबर  देऊन लॉगिन वर जाऊन क्लिक करा.
या नंतर आपल्याला इथे Update Address Via Address Proof चे विकल्प मिळेल. या विकल्पाची निवड केल्यावर एका नवीन पानावर आपल्याला आपला नवीन पत्त्याची माहिती द्यावी लागणार. 
ह्याचबरोबर आपल्याला काही महत्त्वाचे दस्तऐवजसुद्धा जमा करावे लागणार. आपल्या ऑनलाईन व्हेरिफिकेशन नंतर आपल्या आधार कार्डामधील पत्ता बदलविण्यात येईल. तसेच आपले नवीन आधार कार्ड आपल्या नव्या पत्त्यावर पोस्टाने पाठविण्यात येईल. अधिक माहितीसाठी आपण UIDAI च्या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्यावे.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

पुढील लेख
Show comments