1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 21 एप्रिल 2020 (16:40 IST)

ZOOM अॅपवर ऑनलाइन क्लास सुरू असतानाच घडली लज्जास्पद घटना

ZOOM app. not safe
गुजरातच्या अहमदाबाद येथे एका धक्कादायक घटनेत झूम अॅपवर ऑनलाइन क्लास सुरु असताना एका अज्ञात व्यक्तीने अॅप हॅक करुन अश्लील कृत्य केल्याचे वृत्त आहे. 
 
गुजरातच्या निरमा युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाइन क्लास सुरू असताना हा प्रकार घडला. एका विद्यार्थिनीने याबाबत राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार केल्यानंतर ही घटना समोर आली. 
 
एनसीडब्ल्यूने या घटनेची गंभीर दखल घेतली असून गुजरातच्या पोलिस महासंचालकांना याबाबत पत्र लिहिले आहे. ऑनलाइन व्हिडिओ क्लास सुरू असताना अचानक एका अज्ञात व्यक्तीने हॅक करुन हस्तमैथुन केल्याच्या घटनेची चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रीय महिला आयोगाने केली पत्राद्वारे केली आहे.
 
सरकारने 16 एप्रिल रोजी सुरक्षिततेच्या कारणास्तव झूम अॅप न वापरण्याची सूचना केली होती.