Daily Horoscope
✕

गॅस सिलिंडर संपण्याआधी कसा अंदाज येतो? स्वयंपाकघरातील हा सोपा उपाय जाणून घ्या

Updated: गुरूवार, 8 ऑक्टोबर 2026 (13:39 IST)
 
ओल्या कपड्याची पद्धत काम कशी करते? 
आपल्या घरात वापरल्या जाणाऱ्या एलपीजी सिलिंडरमध्ये गॅस हा द्रव रूपात प्रचंड दाबाखाली साठवलेला असतो. द्रव गॅस हा अत्यंत थंड असतो. जेव्हा तुम्ही ओला कपडा सिलिंडरला लावता, तेव्हा गॅस असलेला खालील भाग कपड्यातील ओलावा आणि उष्णता स्वतःकडे शोषून घेतो, ज्यामुळे तो भाग थंडच राहतो आणि तेथील पाणी सुकायला वेळ लागतो सिलिंडरचा भाग जिथे फक्त वाफ/हवा असते (गॅस संपलेला असतो), तिथे उष्णता शोषली जात नाही. त्यामुळे बाहेरील हवेच्या तापमानामुळे तो भाग पटकन सुकतो. कपडा सुकल्यानंतर जिथे ओल्या आणि सुक्या भागाची स्पष्ट रेष दिसते, तिथपर्यंत तुमचा गॅस शिल्लक आहे हे स्पष्ट होते.
 
गॅस संपत आल्याची इतर ३ प्रमुख लक्षणे
गॅसच्या ज्योतीचा रंग बदलणे: शेगडीची ज्योत नेहमी निळ्या रंगाची जळते. पण सिलिंडर संपत आला की ही ज्योत पिवळी किंवा लालसर दिसू लागते.
शेगडीचा आवाज बदलणे: सिलिंडरमधील गॅसचा दाब कमी झाल्यामुळे शेगडी पेटवताना किंवा जळताना फुसफुसणारा वेगळा आवाज येतो.
गॅसचा विशिष्ट वास येणे: गॅस अगदी तळाशी आला की तीव्र वास येऊ लागतो.
 
गॅस बचत करण्यासाठी आणि सिलिंडर जास्त दिवस टिकवण्यासाठी टिप्स
झाकण ठेवून स्वयंपाक करणे: कोणतीही गोष्ट शिजवताना त्यावर झाकण ठेवल्यास वाफेमुळे अन्न लवकर शिजते आणि २०-३०% गॅस वाचतो.
ओल्या वस्तू थेट शेगडीवर न ठेवणे: भांडी किंवा भाज्या पूर्ण सुकल्यानंतरच गॅसवर ठेवाव्यात, अन्यथा पाणी वाफवण्यातच गॅस वाया जातो.
शिजण्यापूर्वी तयारी करणे: फोडणी किंवा स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी सर्व भाज्या चिरून आणि मसाले तयार ठेवावेत.
प्रेशर कुकरचा जास्तीत जास्त वापर: उघड्या भांड्यांपेक्षा कुकरमध्ये अन्न ७५% वेगाने शिजते.
बर्नर नियमित साफ करणे: बर्नरच्या छिद्रांमध्ये कचरा किंवा अन्न अडकल्यास गॅस पूर्ण क्षमतेने जळत नाही. बर्नर नेहमी स्वच्छ ठेवावेत.
 
सुरक्षेची महत्त्वाची टीप: सिलिंडर तपासताना किंवा बदलताना कधीही काडीपेटी, मेणबत्ती किंवा उघड्या ज्योतिचा जवापर मुळीच करू नका. गॅसचा वास येत असल्यास मुख्य रेग्युलेटर लगेच बंद करा, खिडक्या-डेस्क उघडा आणि विजेची बटणे चालू किंवा बंद करू नका.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

महाराष्ट्रात 'ऑक्टोबर हीट' हाहाकार: तापमान ३९.६° पर्यंत, कोल्हापूर-सातारा यांना विजेसह पावसाचा इशारा!

LIVE: नाना पाटेकर यांच्यावर आज सायंकाळी ४ वाजता पुण्यात अंत्यसंस्कार; शासकीय सन्मानाने दिला जाणार निरोप

Suzuki e SKY EV सुझुकीने आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार सादर केली: ३१० किमीची रेंज आणि BYD ची बॅटरी

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेबाबतच्या फसवणुकीपासून सावध राहा; सरकार लवकरच ऑनलाइन पोर्टल सुरू करणार

MPSC आंदोलन: विद्यार्थ्यांकडे समाजकंटक म्हणून पाहू नये; पारदर्शक परीक्षा घेणे हे सरकारचे कर्तव्य - मुंबई उच्च न्यायालय

पुढील लेख
Show comments