suvichar
✕

500 रुपयांच्या बनावट नोटा अशा ओळखा...

Updated: मंगळवार, 6 जून 2023 (16:50 IST)
 
दरम्यान 31 मार्च 2022 पर्यंत चलनात असलेल्या एकूण नोटांच्या मूल्यापैकी 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांचा वाटा 87.1 टक्के होता. सरत्या आर्थिक वर्षात 500 रुपयांच्या नोटांचा वाटा सर्वाधिक होता. 500 रुपयांच्या 25,81,690 कोटी रुपयांच्या नोटा सध्या चलनात आहेत.
 
500 रुपयांच्या या बनावट नोटा चलनात असल्याने लोकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.
 
पण या 500 रुपयांच्या बनावट नोटा ओळखायच्या कशा? 2016 मध्ये झालेल्या नोटाबंदीमुळे खोट्या नोटांची समस्या का सुटली नाही?
 
500 रुपयांची नवी नोट कधी आली?
केंद्र सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी मोठ्या चलनी नोटा चलनातून बाद केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीची घोषणा करत 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा अवैध ठरवल्या.
 
जुन्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 500 रुपयांच्या नोटा नव्या डिझाईनमध्ये आणल्या. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नोटेत बदल करण्यात आले होते.
 
या नव्या नोटांचा रंग, आकार, सुरक्षा वैशिष्ट्ये आणि आकृतिबंध आधीच्या नोटांपेक्षा खूप वेगळा आहे.
 
दगडी राखाडी रंगाची ही नवी नोट 66 मिमी x 150 मिमी आकाराची आहे.
 
आरबीआयच्या अहवालात असं म्हटलंय की, 500 रुपयांच्या नोटांमध्ये अतिरिक्त सुरक्षा वैशिष्ट्य देऊनही बनावट नोटा चलनात वाढत आहेत.
 
नोटाबंदीने काय साध्य झालं?
8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा केली. याअंतर्गत 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा म्हणजेच 86 टक्के चलन बाद करण्यात आलं.
 
या नोटाबंदीनंतर लोकांनी आपल्या जवळच्या मोठ्या रकमेच्या नोटा बदलण्याचा प्रयत्न केला.
 
अर्थव्यवस्थेतील बनावट नोटा हद्दपार करण्यासाठी नोटाबंदी करण्यात आल्याचं केंद्र सरकारने म्हटलं होतं.
 
शिवाय भ्रष्टाचार, काळया पैशावर अंकुश ठेवणे, बनावट नोटा हद्दपार करणे आणि दहशतवादाला मिळणारा निधी रोखणे हा नोटबंदीचा मुख्य हेतू असल्याचं केंद्र सरकारने म्हटलं होतं.
 
पण नोटाबंदी करूनही सरकारचा उद्देश सफल झाल्याचं दिसत नाही.
 
कारण आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलंय की, या आर्थिक वर्षात 500 रुपयांच्या बनावट नोटांची संख्या 14.4 टक्क्यांनी वाढली आहे.
 
500 रुपयांची बनावट नोट कशी ओळखाल?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वेळोवेळी लोकांना 500 रुपयांच्या बनावट नोटा कशा ओळखायच्या याची माहिती देते.
 
'द इकॉनॉमिक टाईम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार आरबीआयने म्हटलंय की, चलनात असलेल्या सर्व नोटांसाठी महात्मा गांधींची नवी मालिका आहे.
 
या नोटांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरची स्वाक्षरी आहे. नोटेवर मागच्या बाजूला ठसठशीत आकारात भारतीय वारसा सांगणारी वास्तू लाल किल्ला छापलेला आहे.
 
या नोटेचा मूळ रंग दगडी राखाडी आहे
 
500 रुपयांच्या नोटेमध्ये तुम्हाला खालील गोष्टी तपासाव्या लागतील
 
नोटेवर पुढच्या बाजूला प्रकाश आरपार जाऊ शकेल असा छोटा भाग आहे. ज्या मूल्याची नोट आहे ते मूल्य आकड्यात लिहिल्यावर तयार होणाऱ्या आकाराचा हा पारदर्शी भाग आहे.
 
नोटेच्या पुढच्या बाजूवर देवनागरी भाषेत तिचं 500 हे मूल्य लिहिलेलं आहे.
 
नोटेच्या मध्यभागी महात्मा गांधींची प्रतिमा आहे.
 
गांधीजींचं चित्र असलेल्या ठिकाणी देवनागरीतील लहान अक्षरात भारत लिहिलं आहे.
 
भारतीय नोटांमध्ये ती खरी आहे हे कळावं म्हणून आणि तिचं मूल्य राखलं जावं म्हणून मध्ये चांदीचा एक धागा असतो. या सुरक्षा धाग्यावर 'भारत' आणि आरबीआय असे शब्द लिहिले आहेत.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

पुढील लेख
Show comments