deepawali
✕

पासवर्ड तयार करताना बहुतेक लोक या तीन चुका करतात! या गोष्टी ठेवा लक्षात

Updated: शुक्रवार, 11 सप्टेंबर 2026 (16:38 IST)
अतिशय सोपे शब्द वापरणे, वैयक्तिक माहितीचा समावेश करणे आणि सर्वत्र एकच पासवर्ड वापरल्याने तुमची खाती सहज हॅक होऊ शकतात. म्हणून, पासवर्ड तयार करताना आपण कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, तसेच मजबूत पासवर्ड तयार करताना कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, चला जाणून घ्या....

तुमच्या पासवर्डमध्ये वैयक्तिक माहिती वापरू नका
तुमच्या पासवर्डमध्ये तुमचे नाव, जन्मतारीख, वाहनाचा नंबर किंवा फोन नंबर वापरणे ही सर्वात मोठी चूक आहे. लोकांना हे लक्षात ठेवायला सोपे वाटतात, पण हॅकर्स किंवा तुमचे ओळखीचे लोक अनेकदा हे आधीच ओळखतात. तुमच्या कोणत्याही खात्याच्या पासवर्डमध्ये तुमची वैयक्तिक ओळख किंवा जन्मतारीख समाविष्ट करणे कटाक्षाने टाळा.

लहान आणि सोपा पासवर्ड ठेवण्याचा धोका
दुसरी चूक म्हणजे खूप लहान किंवा सोपा पासवर्ड निवडणे, नंबर किंवा फक्त तुमचे नाव लिहिणे. हॅकर्सकडे प्रगत सॉफ्टवेअर आणि साधने आहे जी काही सेकंदात सोपे आणि लहान पासवर्ड क्रॅक करू शकतात. म्हणून, पासवर्ड कधीही खूप लहान किंवा सोपा नसावा.

सर्वत्र एकच पासवर्ड वापरू नका
तिसरी गंभीर चूक म्हणजे तुमच्या सर्व सोशल मीडिया आणि बँकिंग खात्यांसाठी एकच पासवर्ड वापरणे.
जर तुमचा पासवर्ड एका वेबसाइट किंवा सेवेवरून लीक झाला, तर सायबर गुन्हेगार तोच पासवर्ड वापरून तुमची इतर सर्व खाती सहजपणे हॅक करू शकतात. म्हणून, प्रत्येक खात्यासाठी एक वेगळा पासवर्ड असणे महत्त्वाचे आहे.

एक मजबूत आणि सुरक्षित पासवर्ड कसा तयार करावा?
तुमची ऑनलाइन खाती पूर्णपणे सुरक्षित ठेवण्यासाठी, नेहमी १२ ते १६ अक्षरांचा एक मोठा पासवर्ड तयार करा. त्यामध्ये मोठी आणि लहान अक्षरे, अंक, आणि विशेष चिन्हे यांचे मिश्रण समाविष्ट करा.
ALSO READ: महामार्गावरील अस्वच्छ शौचालयाचा फोटो काढा आणि १,००० चा फास्टॅग रिचार्ज मिळवा<> Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: ॲपमध्ये 'ही' ४ चिन्हे दिसल्यास त्वरित करा अनइन्स्टॉल, अन्यथा बँक खाते होईल रिकामे!

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

LIVE: अकोल्यात दुष्काळाचा फटका: १ लाख रुपयांच्या कर्जापोटी दिव्यांग शेतकऱ्याचे घर सील

नागपुरातील पराभवामुळे महायुतीत वादाची ठिणगी; शिंदेंना मुख्यमंत्री करण्याची मागणी जोर धरू लागली!

'आनंदाचा शिधा' बंद! महाराष्ट्रात ८३ हजार कुटुंबांची दिवाळी फीकी

विरारमधील बंद फ्लॅटमध्ये तीन भावंडांचे मृतदेह आढळले; मृत्यूआधी रेकॉर्ड केला व्हिडिओ; आत्महत्येचा संशय

आनंदाची बातमी! BMC कर्मचाऱ्यांना ३३ हजार दिवाळी बोनस, तब्बल ९३ हजार कर्मचाऱ्यांना फायदा

पुढील लेख
Show comments