गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Updated : मंगळवार, 21 जानेवारी 2020 (16:02 IST)

PAN-Aadhar लिंक करण्याची सोपी प्रक्रिया जाणून घ्या

31 डिसेंबर पर्यंत पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणं बंधनकारक असल्याचं आयकर विभागानं म्हटलंय. आयकर सेवेचा लाभ मिळवण्यासाठी पॅन कार्ड-आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. 
 
आधार कार्ड हे यूनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया (UIDAI) आणि पॅन कार्ड हे आयकर विभागाकडून (Income Tax Department) देण्यात येते.
 
पॅन-आधार या प्रकारे करा लिंक
• भारतीय आयकर विभागाच्या वेबसाईटवर जा.
 
• तिथे डाव्या बाजूस विविध पर्यायांची यादीत 'Link Aadhar' या पर्यायावर क्लिक करा.
 
• ऑनलाईन फॉर्म उघडून आवश्यक माहिती भरा. माहिती भरून झाल्यानंतर 'Link Aadhar' वर क्लिक करा.
 
• पॅन-आधार लिंक होण्यास काही वेळ लागतो. त्यामुळं लिंक झालंय की नाही, हे पाहण्यासाठी याच ठिकाणी 'तुमचं पॅन-आधार लिंक झालंय का ते इथं पाहा' अशा आशयाचं इंग्रजी/हिंदीत लिहिलेलं दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचं पॅन-आधार लिंक झालंय की नाही, ते पाहू शकता.
 
SMS द्वारे या प्रकारे करा लिंक 
SMS मध्ये UIDPN टाइप करा. नंतर स्पेस देऊन आपला आधार नंबर आणि त्यानंतर पॅन नंबर टाइप करा. UIDPAN<space><12-digit Aadhaar><space><10-digit PAN> या प्रकारे लिहून 567678 किंवा 56161 वर पाठवा. यानंतर आयकर विभाग दोन्ही नंबर लिंक करण्याची प्रोसेस सुरु करेल.