गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2020
Written By
Last Modified: मंगळवार, 17 डिसेंबर 2019 (10:46 IST)

लाल किताब 2020 : हनुमंताचे हे 3 कार्य करा, ह्या वर्षी सर्व संकटापासून मुक्त व्हा

अंकशास्त्रानुसार 2020 या वर्षावर राहूचा प्रभाव आहे आणि जर का आपल्या कुंडलीत राहू नीच बाजूस असेल तर आपण लाल किताबानुसार उपाय करावे. हे उपाय केल्याने आपण कुठल्याही संकटापासून मुक्ती मिळवू शकता आणि वर्ष आनंदाने घालवू शकता.
 
* उपाय*
 
बजरंग बाण 
लाल किताबा अनुसार एखाद्या व्यक्तीस राहू आणि केतूचा त्रास असेल आणि त्यासाठी कोणतेही उपाय योजले जात नसतील आणि त्या व्यक्तीवर मृत्यूचे सावट असेल तर त्याने मंगळवार आणि शनिवारी मारुतीच्या बजरंग बाणाचा उपाय करावा. आणि बजरंग बाणाचे नियमित वाचन करावे. 
 
चोळा अर्पण करणे
मारुतीच्या मूर्तीस किमान 5 शनिवार चोला अर्पण करावा. असे केल्याने सर्व संकटाचा नायनाट होईल. त्याचबरोबर हनुमान चालीसाचे वाचन करणे ही योग्य ठरेल. तसेच विड्याचे पाने ही मारुतीस अर्पण करावी.
 
वड्याच्या पानावर कणकेचे दिवे
दर मंगळवारी आणि शनिवारी हनुमान चालिसाचे पठण करावे. नंतर वडाच्या पानावर कणकेचे दिवे लावल्याने सर्व दुःख आणि त्रास दूर होतात. अकाल मृत्यूची भीती टळते. शनीच्या साडेसाती मुळे शनी पीडेने प्रभावित, राहू केतूच्या दशामुळे प्रभावित लोकांनी हे उपाय केल्याने त्वरित आराम मिळतो. अशाने सर्व संकटे दूर होतात.