शुक्रवार, 31 मार्च 2023
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2020
Written By
Last Modified सोमवार, 16 डिसेंबर 2019 (12:27 IST)

Health Horoscope 2020 आरोग्य राशिभविष्य: कुंभ

या वर्षी आपल्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या वर्षी आपल्या आरोग्यामध्ये अस्थिरता येऊ शकते.
 
फेब्रुवारी ते मे पर्यंतच्या काळात आपल्याला आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी लागेल. मानसिक ताण सहन करावा लागेल. याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होईल. अनिद्रा, डोळ्यांचे विकार, पोटाचे विकार यासारखे त्रास उद्भवू शकतात. यांच्यावर वेळेतच आपले संरक्षण करणे गरजेचे आहे.
 
मानसिक समस्या जरी नसल्या तरी मानसिक ताणतणाव राहतील. खाण्याचे पथ्य सांभाळा. जास्त गरिष्ठ तळलेले आहारांचा वापर टाळावा. आपले वजन वाढू शकते. आपली दिनचर्या नियमित करा. वेळीस योग प्राणायाम करा ज्याने नवीन ऊर्जा मिळेल. आपण आपले कार्य व्यवस्थित करू शकाल. सूर्य प्रकाशाचा लाभ घ्या हे आपल्या आरोग्यास लाभप्रद ठरेल.