रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2020
Written By
Last Updated : सोमवार, 23 डिसेंबर 2019 (12:57 IST)

Love Horoscope 2020 प्रेम राशिभविष्य: कुंभ

कुंभ राशीच्या जाताकांसाठी हा काळ अनुकूल नसल्यामुळे आधीपासून रिलेशनमध्ये असणार्‍यांनी आपलं नातं मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. 
 
अनेक प्रकाराच्या विरुद्ध परिस्थिती आणि काही जवळीक मित्रांमुळे आपल्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतं. तिसर्‍या व्यक्तीला आपल्या जीवनात ढवळाढवळीची परवानगी देऊ नका. या वर्षी एकाहून अधिक लोकांकडे आपलं ओढ वाटू शकते अर्थातच आपले एकाहून अधिक प्रेम संबंध असू शकतात. अशात स्वतः:वर ताबा ठेवत आपल्या विशेष साथीदाराकडे लक्ष देणे योग्य ठरेल.
 
कुंभ राशीच्या जातकांसाठी फेब्रुवारी ते मार्च या दरम्यानचा काळ उत्तम ठरेल आणि आपण सिंगल असल्यास विवाहाची शक्यता अधिकच जुळून येईल. नंतर मार्च ते जून हा काळ देखील काहीसा प्रतिकूल राहील ज्यात विशेष काळजी घेण्याची गरज पडेल. 
 
जूनच्या शेवटपासून ते नोव्हेंबर पर्यंतचा काळ आपल्या प्रेम जीवनासाठी वरदान सिद्ध होईल आणि या दरम्यान आपलं प्रेम जीवन बहरेल. आपले प्रेम जीवन सुधारेल. या काळात आपण प्रेम जीवनाला एक नवीन दिशा देऊ शकतात. सोबत चांगला वेळ घालवू शकतात. नोव्हेंबरनंतर परिस्थिती गडबड दिसत असल्या संयम ठेवावे.