1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2020
Written By
Last Updated: सोमवार, 23 डिसेंबर 2019 (12:57 IST)

Love Horoscope 2020 प्रेम राशिभविष्य: मकर

मकर राशीच्या जातकांसाठी हे वर्ष अनुकूल राहील आणि जर आपण लॉग डिस्टेंस रिलेशनशिपमध्ये आहात तर हे वर्ष आपल्यासाठी उत्तम ठरणार आहे. या व्यतिरिक्त आपल्या पार्टनरशी दूर झालेल्या लोकांसाठी पुनर्मिलनाची वेळ आहे. तसेच काही लोकांना स्थान परिवर्तनामुळे काही लोकांना आपल्या पार्टनरशी लांब जावं लागणार आहेत तरी प्रेम जीवनातील आनंद कमी होणार नाही.
 
मकर राशीच्या जातकांचा आत्मिक स्वभाव खूप खोल असल्यामुळे ते ज्यांच्यावर प्रेम करतात अगदी मनापासून करतात. या वर्षी प्रेमाच्या बाबतीत ईश्वराची विशेष कृपा असेल आणि सिंगल असणार्‍यांनी लग्नाची तयारी लागण्याची वेळ आहे. एप्रिल ते जून हा काळ उत्तम ठरेल आणि नंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर यात विवाहाचे योग आहे. अशात आपण कोणत्याच प्रेमात असाल तर प्रपोज करा आणि नेहमीसाठी प्रेम आपल्यावर नावावर करून घ्या. 
 
आधीपासूनच रिलेशनमध्ये असणार्‍यांचं नातं घट्ट होईल आणि ते एकमेकांप्रती समर्पित होऊन जीवनात पुढे वाढण्याचा निश्चय करतील. मार्चच्या शेवटपासून ते जुलै पर्यंत आणि डिसेंबर हा काळ आपल्यासाठी सर्वोत्तम ठरेल. हा काळ आपल्यासाठी रोमँटिक काळ असेल आणि या दरम्यान आपण प्रेमात आकंठ बुडाल.