बुधवार, 5 ऑक्टोबर 2022
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2020
Written By
Last Updated: सोमवार, 23 डिसेंबर 2019 (12:58 IST)

Love Horoscope 2020 प्रेम राशिभविष्य: तूळ

तूळ राशीच्या जातकांसाठी हे वर्ष शिकवण देणारं सिद्ध होईल आणि या वर्षी आपल्याला प्रेम जीवनात स्थिरता जाणवेल. आपल्या प्रेम जीवनात शांती राहील आणि संबंध चांगले राहतील. 
 
या वर्षी आपल्याला काही धडे शिकायला मिळतील ज्याने भविष्यात मार्गदर्शन मिळेल. या वर्षी प्रेमी जोडपे विवाह बंधनात अडकतील.
 
या वर्षी आपल्याला पार्टनरच्या गरजांकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि कोणाचेही कौतुक करण्यात कमतरता कसली. आपल्या पार्टनरचे भरभरून कौतुक करा. असे कुठलेही कार्य करणे टाळा ज्याने ज्यामुळे पार्टनर हर्ट होऊ शकतो. आपल्या भावनांवर ताबा ठेवा पार्टनरला नियंत्रित करण्याचा प्रयत्न सोडा. 
 
आतुरता कामाची नाही. लांबचा विचार करा आणि सभ्यपणे वागा. संयमपूर्वक वागल्याने यश मिळेल. पार्टनरला समजून घ्या याने नात्यातील गोडवा टिकेल. 
 
पूर्ण वर्ष आपल्या इच्छा पूर्ण करण्याच्या भानगडीत प्रेम जीवनात नुकसान आणि समस्या झेलाव्या लागू शकतात. या वर्षी जानेवारी तसेच मे ते सप्टेंबरचा काळ आपल्या प्रेम जीवनासाठी उत्तम ठरेल.