सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2020
Written By
Last Updated : सोमवार, 23 डिसेंबर 2019 (12:58 IST)

Love Horoscope 2020 प्रेम राशिभविष्य: वृश्चिक

हे वर्ष वृश्चिक राशीसाठी यश देणारे आहे. आपण सिंगल असल्यास आपल्या जीवनात नवीन व्यक्ती येणार ज्यासोबत नातं खूप काळ कायम टिकू शकतं. आपल्याला प्रेम जीवनात अशा परिस्थितीला सामोरा जावं लागू शकतो ज्याने लव्ह लाईफ चांगल्यासाठी बदलेल. काही परिस्थिती अचानक बदलतील. 
 
या विरुद्ध काही लोकांना आपल्या प्रेम जीवनात काही कठिण निर्णय घ्यावे लागू शकतात. नात्यात पुढे वाढण्यापूर्वी पुनर्विचार करा. एकदा रिलेशनमध्ये पडल्यावर आपल्या साथीकडे समर्पित व्हा आणि महत्त्व द्या. काही लोकं आपल्या बेस्ट फ्रेंडला प्रपोज करू शकतात जे त्यांच्या जीवनात तसेही महत्त्वाचे आहे.
 
मे ते जून या दरम्यान आपल्या प्रेम जीवनात चढ- उतार बघायला मिळतील. या दरम्यान आपल्याला शांत चित्ताने काही निर्णय घ्यावे लागतील. आपलं ब्रेकअप झालं असेल तर या दरम्यान जुन्या पार्टनरची वापसी देखील होऊ शकते.