सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: मंगळवार, 15 मार्च 2022 (21:53 IST)

SMS पाठवून लगेच आधार-पॅन कार्ड लिंक करा, अन्यथा एवढा भुर्दंड लागू शकतो

आपण आपले  पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नसेल तर या गोष्टी ताबडतोब करा कारण शेवटची तारीख अगदी जवळ आली आहे. वास्तविक, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (CBDT) नुसार 31 मार्चपर्यंत आपले पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करू शकता. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी, 2017 मध्ये CBDT ने जाहीर केले की सर्व भारतीय नागरिकांना त्यांचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करावे लागेल. जेणे करून आयकर विभागाला कोणत्याही प्रकारची करचोरी शोधून काढता येते आणि एकाधिक पॅन कार्ड जारी करण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होते, कारण बरेच लोक सरकारची फसवणूक करण्यासाठी एकाधिक पॅन कार्ड बनवतात.
CBDT द्वारे पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची पहिली अंतिम मुदत 5 ऑगस्ट 2017 होती, तथापि, विभागाने विविध कारणांमुळे मुदत वाढवून ठेवली. CBDT ने जारी केलेली नवीन अंतिम मुदत 31 मार्च 2022 आहे.
 पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केल्याशिवाय आयकर रिटर्न भरू शकता, आपण लिंकिंग पूर्ण करेपर्यंत आयकर विभाग आपल्या रिटर्नवर प्रक्रिया करणार नाही. दिलेल्या मुदतीपूर्वी पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्यात अयशस्वी झाल्यास 10,000 रुपये दंड आणि पॅन कार्ड देखील निष्क्रिय केले जाऊ शकते.
असे अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे आपण आपले पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करू शकता. या साठी या स्टेप्सचे अनुसरण करू शकता.
 
 एसएमएसद्वारे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करा:
1 आपल्या स्मार्टफोनवर Messages अॅप उघडा.
2 एक नवीन संदेश तयार करा.
3 टेक्स्ट मेसेज  विभागात, UIDPAN <12 अंकी आधार क्रमांक> <10 अंकी पॅन क्रमांक> टाइप करा आणि 567678 किंवा 56161 वर एसएमएस पाठवा.
 
वेबसाइटला भेट देऊन देखील पुढील गोष्टी देखील करू शकता:
 
1 आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलला भेट द्या - www.incometaxindiaefiling.gov.in 
 2 आपण युजर आयडी, पासवर्ड आणि जन्मतारीख वापरून पोर्टलवर लॉग इन करा.  पोर्टलवर नोंदणीकृत नसल्यास, आपण आपले  पॅन कार्ड वापरून ते सहज करू शकता.
3 मेनू बारवर, 'प्रोफाइल सेटिंग्ज' वर क्लिक करा आणि 'आधार लिंक करा' निवडा.
4 स्क्रीनवर प्रदर्शित केलेले पॅन कार्ड तपशील आपल्या  आधार कार्ड तपशीलांशी जुळतात का ते तपासा.
5 जर काही जुळत नसेल, तर आपल्याला कोणत्याही कागदपत्रांमध्ये ते दुरुस्त करावे लागेल. तपशील जुळत असल्यास, तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि 'Link Aadhaar'' बटणावर क्लिक करा. आपले पॅन कार्ड आणि आधार कार्ड यशस्वीरित्या लिंक झाल्यावर आपल्याला सूचित केले जाईल.