Festival Posters
✕

महाराष्ट्र किशोरी शक्ति योजना2022 : पात्रता, लाभ, उद्देश, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

Updated: सोमवार, 4 जुलै 2022 (22:52 IST)
 
MKSY 2022 चे उद्दिष्ट
MKSY 2022 ही सध्या देशातील महिला सक्षमीकरणासाठी चालवली जात असलेली सर्वात मोठी योजना आहे,
या योजनेचा उद्देश गरीब किशोरवयीन मुलींना शैक्षणिक प्रशिक्षण देणे हा आहे.
या योजनेद्वारे किशोरवयीन मुली शारीरिक व मानसिकरित्या स्वस्थ होऊन आपल्या पायावर उभ्या राहाव्यात, हाच मुख्य उद्देश या योजनेचा आहे.या किशोरवयीन मुलींचे चांगले पोषण झाले, त्यांना चांगले शिक्षण मिळाले, त्यांचे आरोग्य चांगले राहिले, तर त्याही पुढे चालून देशाला, कुटुंबाला पुढे नेण्यासाठी सक्षम बनतील. किशोरवयीन मुलींचे पोषण चांगले झाले तरच देश समृद्ध व सुदृढ होईल, या गोष्टींचा विचार करुनच महाराष्ट्र किशोरी शक्ती योजना 2022 ही योजना राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाने सुरू केली आहे.
 
पात्रता
योजनेचा लाभ केवळ दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील किशोरवयीन मुलींनाच मिळणार आहे.
या योजनेंतर्गत केवळ 11 ते 14 वयोगटातील मुलींनाच प्रशिक्षण घेता येणार आहे.
या योजनेअंतर्गत 16 ते 18 वयोगटातील मुलींना कौशल्य निर्मितीसाठी शिक्षण दिले जाणार आहे.
महाराष्ट्रातील कायमस्वरूपी नागरिकांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
 
आवश्यक कागदपत्रे -
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे सर्व आवश्यक कागदपत्रे जसे की आधार कार्ड, मुलीचा जन्म दाखला, बीपीएल कार्ड, शाळेचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला आणि जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
 
अर्ज कसा करावा?
सर्वप्रथम या योजनेसाठी जारी केलेल्या अधिकृत वेबसाइटवर
https://womenchild.maharashtra.gov.in/ क्लिक करा. त्या नंतर एक पेज उघडेल. नंतर एक अर्ज डाउनलोड करावा लागेल. कागदपत्रे प्रविष्ट करा. त्यानंतर आपली सर्व माहिती प्रविष्ट करा. मागितलेली सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा. नंतर अर्ज सबमिट करून पावती घ्या. 
 
 
 

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्रातील ३५८ पैकी ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

आधी बंद दाराआड गुप्त बैठक! मग दोन्ही ठाकरे बंधू मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत मंचावर दिसले

दिवाळीनिमित्त नागपूर-मुंबई आणि पुणे मार्गावर विशेष गाड्या धावणार, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा मोठा निर्णय

Ranji Trophy 2026-27: मुंबईने रणजी ट्रॉफीच्या तिसऱ्या फेरीत हरियाणाला १० गडी राखून पराभूत केले

पाकिस्तानमध्ये रुग्णवाहिकेत ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट; बाळंतीण महिलेसह १० जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments