सोमवार, 11 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आवश्यक माहिती
Written By
Last Updated : गुरूवार, 8 डिसेंबर 2022 (13:06 IST)

सरकार देणार 50,000 रुपये, माझी कन्या भाग्यश्री योजना 2022 Majhi Bhagyashree Kanya Yojana

Majhi Kanya Bhagyashree Yojana
मुलींचे प्रमाण सुधारण्यासाठी आणि महिला शिक्षणाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 1 एप्रिल 2016 रोजी माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत राज्यातील ज्या आई किंवा वडिलांनी मुलीच्या जन्मानंतर 1 वर्षाच्या आत नसबंदी केली तर त्या मुलीच्या नावाने 50,000 रुपये शासनाकडून बँकेत जमा केले जातील. माझी भाग्यश्री कन्या योजना 2022 अंतर्गत, आई-वडिलांमध्ये दुसरी मुलगी झाल्यानंतर कुटुंब नियोजनाचा अवलंब केल्यास, नसबंदीनंतर दोन्ही मुलींच्या नावे 25000-25000 रुपये बँकेत जमा केले जातील.
 
Majhi Bhagyashree Kanya Yojana 2022
या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकाच व्यक्तीच्या दोन मुलींनाच लाभ दिला जाणार आहे. Majhi Bhagyashree Kanya Yojana 2022 अंतर्गत पालकांना एका मुलीच्या जन्माच्या 1 वर्षात नसबंदी करवावी लागेल तर दुसर्‍या मुलीच्या जन्माच्या 6 महिन्याच्या आत नसबंदी करणे अनिवार्य आहे. या योजनेंतर्गत पूर्वी दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे (BPL) ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपर्यंत होते ते यासाठी पात्र होते. नवीन धोरणानुसार या योजनेंतर्गत मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांवरून 7.5 लाख रुपये करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 7.5 लाख रुपये आहे ते देखील या योजनेसाठी पात्र असतील.
 
Majhi Bhagyashree Kanya Yojana 2022 चा उद्देश
जसे की माहित आहे की मुलींना ओझं मानणारे आणि मुलींची भ्रूणहत्या करणारे आणि मुलींना जास्त अभ्यास करू न देणारे अनेक लोक आहेत. या समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने ही महाराष्ट्र माझी भाग्यश्री कन्या योजना 2022 सुरू केली आहे. या योजनेद्वारे मुलींचे प्रमाण सुधारणे, लिंग निर्धारण आणि स्त्री भ्रूणहत्या थांबवणे, मुलींना शिक्षणाकडे प्रोत्साहन देणे आणि राज्यातील लोकांची नकारात्मक विचारसरणी बदलणे असा उद्देश आहे.
 
या योजनेत मुलीला व्याजाचे पैसे मिळणार नाहीत. पहिल्यांदा मुलगी 6 वर्षांची होईल आणि दुसऱ्यांदा मुली 12 वर्षांची झाल्यावर व्याजाचे पैसे मिळतील. मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर तिला पूर्ण रक्कम मिळण्यास पात्र असेल. महाराष्ट्र माझी कन्या भाग्यश्री योजना 2022 चा संपूर्ण लाभ घेण्यासाठी मुलगी किमान 10वी उत्तीर्ण आणि अविवाहित असणे आवश्यक आहे. या योजनेंतर्गत पात्र होऊ इच्छिणाऱ्या राज्यातील पालकांना अर्ज करावा लागणार आहे.
 
यात मुलगी किंवा तिच्या आईच्या नावाने बँक अकाउंट उघडण्यात येईल. या अकाउंटमध्ये राज्य सरकार द्वारे वेळोवेळी ही रक्कम मुलीच्या नावाने बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल.
 
Majhi Kanya Bhagyashree Yojana चे लाभ
या योजनेचा लाभ एका कुटुंबातील दोन मुलींना मिळणार आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजना 2022 अंतर्गत लाभार्थी मुलगी आणि तिच्या आईच्या नावे नॅशनल बँकेत संयुक्त खाते उघडले जाईल आणि त्याअंतर्गत दोघांना 1 लाख रुपयांचा अपघात विमा आणि 5000 रुपयांचा ओव्हरड्राफ्ट मिळेल.
या योजनेनुसार मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन (नसबंदी) केले जाते तर 50 हजार रुपये सरकारकडून देण्यात येणार आहे.
2 मुलींच्या जन्मानंतर कुटुंबनियोजन केल्यास सरकारकडून दोघांना 25-25 हजार रुपये दिले जातील.
राज्य सरकारने दिलेला निधी मुलींच्या शिक्षणासाठी वापरता येईल.
महाराष्ट्रातील अधिकाधिक कुटुंबे या योजनेचा लाभ घेऊ शकतील, म्हणून सरकारने कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा 1 लाख रुपयांवरून 7.5 लाख रुपये केली आहे.
या योजनेनुसार, मुलीच्या जन्माच्या 1 वर्षाच्या आत किंवा दुसऱ्या मुलीच्या जन्माच्या 6 महिन्यांच्या आत मुलींच्या आई किंवा वडिलांना नसबंदी करणे बंधनकारक असेल.
 
Majhi Bhagyashree Kanya Yojana 2022 पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे
अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
जर एखाद्या व्यक्तीला दोन मुली असतील तर त्याला माझी कन्या भाग्यश्री योजना 2022 अंतर्गत लाभ मिळू शकतात.
तिसरे मूल जन्माला आल्यास आधीच जन्मलेल्या दोन्ही मुलींनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.
अर्जदाराचे आधार कार्ड
आई किंवा मुलीचे बँक खाते पासबुक
पत्त्याचा पुरावा
उत्पन्न प्रमाणपत्र
मोबाईल नंबर
पासपोर्ट आकाराचा फोटो
 
Majhi Bhagyashree Kanya Yojana 2022 मध्ये अर्ज कसा करावा?
या MKBY 2022 अंतर्गत अर्ज करू इच्छिणारे राज्यातील इच्छुक लाभार्थी, त्यांना महाराष्ट्र शासन विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन माझी कन्या भाग्यश्री योजनेचा अर्ज PDF डाउनलोड करावा लागेल. अर्ज डाउनलोड केल्यानंतर, तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल जसे की नाव, पत्ता, पालकांचे नाव, मुलीची जन्मतारीख, मोबाइल नंबर इ. सर्व माहिती भरल्यानंतर, तुमची सर्व कागदपत्रे फॉर्मसोबत जोडा आणि तुमच्या जवळच्या महिला व बाल विकास कार्यालयात जमा करा. अशा प्रकारे माझी कन्या भाग्यश्री योजना 2022 मधील तुमचा अर्ज पूर्ण होईल.