Dharma Sangrah
✕

आता पेंशनर देखील घरी बसून जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात

Updated: बुधवार, 25 नोव्हेंबर 2020 (12:02 IST)
 
एवढेच नव्हे तर अनेक सरकारी कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यावर आपल्या कुटुंबियांसह राहण्यासाठी व इतर अनेक कारणांसाठी इतरत्र राहू लागतात. या मुळे त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरी जावे लागते. 
 
डिजीटल प्रमाणपत्र बनवता येतंं- 
जीवन प्रमाणपत्र किंवा लाईफ सर्टिफिकेट साठी पेंशनर लोकांना सरकारी कार्यालयमध्ये फेऱ्या माराव्या लागू नये या साठी सरकारने डिजीटल प्रमाणपत्राची सुविधा सुरू केली आहे. या मध्ये पेंशन धारकाचे बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी आधार नंबरचा वापर करतात. व्हेरिफिकेशन झाल्यावर एक Life certificate बनवले जाते, जे Life  certificate फंड मध्ये देखील संग्रहित केले जाऊ शकते. या मध्ये पेंशन संवितरण एजेन्सी प्रमाणपत्र ऑनलाईन देखील बघू शकतात.
 
अशा प्रकारे डिजीटल प्रमाणपत्र मिळवू शकतो - 
डिजीटल प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पेंशन धारकांना एका विशिष्ट प्रकाराची प्रमाण आयडी बनवावी लागणार. म्हणजे प्रत्येक पेंशन धारकांसाठी ही वेगवेगळी विशिष्ट आयडी असते. पेंशन धारक या आपल्या आयडीला आधार नंबर आणि बायोमेट्रिक्सचा वापर करून बनवू शकतात.  पहिल्यांदा या आयडीला जनरेट करण्यासाठी पेंशन धारकांना स्थानिक सिटीजन सर्व्हिस सेंटरला भेट द्यावी लागणार. 

पेंशन धारकांना आधार नंबर, मोबाईल नंबर, पेंशन पेमेंट ऑर्डर (PPO) क्रमांक आणि पेंशन खाते क्रमांकाच्या व्यतिरिक्त बोटांचे ठसे द्यायचे असते. यशस्वी व्हेरिफिकेशन झाल्यावर मोबाईल नंबर वर एक एसएमएस पावती पाठविली जाते. या मध्ये एक पुरावा आयडी असतो.
 
एकदा डिजीटल जीवन प्रमाणपत्र बनल्यावर हे पेंशन सामायिक करणाऱ्या एजन्सी कडे सादर करावयाचे नसत. जीवन प्रमाण पोर्टल https://jeevanpramaan.gov.in या संकेत स्थळाच्या माध्यमाने हे काम आपण डिजिटली देखील करू शकता. एजेन्सी देखील पोर्टल वरून जीवन प्रमाणपत्र मिळवू शकते. अँड्रॉइड फोन वर उमंग अप द्वारे किंवा पीसी वरील विंडोस द्वारे देखील प्रमाण पत्र जनरेट केले जाऊ शकते.

EPFO ने पाठवले संदेश - 
मोबाईल वर मेसेज पाठवून पेंशन धारकांना सांगितले आहे की या संपूर्ण वर्षात जीवन प्रमाण पत्र कधी ही सादर केले जाऊ शकते. उदाहरणार्थ, जर आपण आपले जीवन प्रमाण पत्र डिसेंबर 2019 मध्ये सादर केले आहेत तर आपण या वर्षी च्या डिसेंबर 2020 मध्येच सादर करावे. जर आपण जानेवारी 2020 मध्ये सादर केले असल्यास तर एक वर्ष पूर्ण झाल्यावरच आपण जीवन प्रमाण पत्र सादर करावे. बँक ईपीएफओच्या व्यतिरिक्त आपल्या नजीकच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) वर देखील प्रमाणपत्र सादर केले जाऊ शकते. 

खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपण जवळचे कॉमन सर्व्हिस सेंटर तपासू शकता. 
https://csclocator.in/csc-locator/madhya-pradesh/Indore-999/Indore-4367/
 
जवळच्या पोस्ट ऑफिस च्या माध्यमाने देखील आपण आपले लाईफ सर्टिफिकेट किंवा जीवन प्रमाण पत्र सादर करू शकता. https://ccc.cept.gov.in/covid/request.aspx

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

पुढील लेख
Show comments