मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Updated : सोमवार, 20 जून 2022 (09:26 IST)

श्वासोच्छवास सुधारण्यासाठी हे 5 आसन अवलंबवा

वेळ काहीही असो, निरोगी आणि तंदुरुस्त जीवनासाठी योग, प्राणायाम किंवा व्यायाम केलाच पाहिजे.या मुळे आपल्या शरीरावर कधीही अतिरिक्त चरबी साचणार नाही.तसेच ताजे वाटेल, मन, शांत,राहील,अशक्तपणा जाणवणार नाही.हे 5 योगासनं केल्याने आपण नेहमी निरोगी राहाल.
 
1 सूर्य नमस्कार -हा व्यायाम सर्व वयोगटातील लोकांनी केला पाहिजे. सूर्यनमस्कार केल्याने - 
* हाडे मजबूत होतात.
* रक्तदाब नियंत्रणात राहते. 
* मेटॉबॉलिझ्म चांगले राहते.
* डोळ्यांची दृष्टी वाढते. 
* फुफ्फुसांची क्षमता वाढते.
* पाठीचा कणा मजबूत होतो. 
* त्वचा रोग होण्याची शक्यता कमी होते.
ज्यांना कंबर दुखी किंवा पाठीचा कणा मध्ये वेदना आहे किंवा ज्यांना पाठीचे काही त्रास आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे करावे.
 
2 कपालभाती - नियमितपणे हे  केल्याने मायग्रेन आणि डोकेदुखीमध्ये आराम मिळतो. पाचक शक्ती मजबूत होते, ऍसिडिटी  दूर करत, फुफ्फुसांची श्वास घेण्याची क्षमता वाढते, मानसिक ताण कमी करतो, रक्त साफ करतो आणि गडद मंडळे कमी करण्यास मदत करतो. हे करण्याची  योग्य पद्धत म्हणजे दररोज सकाळी अनोश्यापोटी हे करावे, मोकळ्या आणि ताज्या हवेमध्ये पद्मासन किंवा सिद्धासनात बसावे. 
 
3 अनुलोम विलोम - प्रत्येक वयोगटातील लोक हे आसन करू शकतात.असं केल्याने फुफ्फुसे बळकट होतात.हे करण्यासाठी  नाकाच्या एका छिद्राने श्वास घेतात आणि दुसऱ्या छिद्राने श्वास सोडतात.सर्वप्रथम उजव्या नाकाचे छिद्र अंगठ्याच्या साहाय्याने बंद करा आणि डाव्या बाजूच्या नाकाच्या छिद्राने श्वास आत ओढा.10 सेकंदा नंतर उजव्या नाकाच्या छिद्रातून श्वास आत ओढा आणि 10 सेकंदा नंतर डाव्या नाकाच्या छिद्राला बंद करा आणि उजव्या नाकाने श्वास सोडा. 
अनुलोम विलोम केल्याने सांधे दुखी, दमा, संधिवात, कर्करोग, ऍलर्जी,बीपी या आजारापासून आराम मिळतो. 
 
4 ॐ चे उच्चारण करणे- फुफ्फुसांना स्वच्छ करण्यासाठी सकाळी सकाळी ॐ चे उच्चारण करावे.असं केल्याने फुफ्फुस बळकट होतात.योगा तज्ज्ञ देखील हे करण्याचा सल्ला देतात. 
 
5 भस्त्रिका प्रणायाम- हे केल्याने फुफ्फुसे बळकट होतात.डोळे,नाक आणि कान देखील निरोगी राहतात.नियमितपणे हे केल्याने पाचन प्रणाली बळकट होते. लठ्ठपणा कमी करण्यात मदत मिळते. श्वासोच्छवास संबंधित रोग बरे करण्यात मदत करतो.