शनिवार, 1 एप्रिल 2023
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified बुधवार, 8 सप्टेंबर 2021 (15:27 IST)

रात्री झोपताना पाय कुळतात,जाणून घ्या 9 कारणे

बरेच लोक रात्री झोपताना त्यांचे पाय कुळत राहतात.किंवा दुखतात.विशेषतः पोटऱ्या जास्त वेदना देतात.हे अनेक कारणांमुळे होऊ शकत.कारण माहित असल्यावर आपण त्याचे निदान करू शकतो.चला तर मग जाणून घेऊ या की पाय का कुळतात.
 
कारणे- पाय दुखणे सहसा स्त्रिया आणि पुरुषांमध्ये दिसून येते. स्त्रियांमध्ये या वेदना होण्याचे मुख्य कारण म्हणजे 
1. स्वयंपाकघरात बराच वेळ काम करणे
2 कपडे धुणे 
3. मधुमेह  
4. उंच टाचांच्या चपला घालणे 
5. अधिक चालणे. 
दुसरीकडे, पुरुषांमध्ये याचे मुख्य कारण
1. खुर्चीवर पाय लटकवून बसणे, 
2 अधिक गाडी चालवणे, 
3 अधिक वेळ उभे राहणे, 
4 कठोर तळवे असलेले शूज घालणे इ.
 
टीप: या वरील कारणांपैकी मधुमेहाव्यतिरिक्त इतर काही कारणे असतील तर येथे सांगितलेले योगासने करून आपण वेदनांपासून सुटका मिळवू शकता. योगाबरोबरच वरील समस्यांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना होणाऱ्या वेदनांपासून मुक्त होण्यासाठी जीवनशैलीमध्ये  बदल करणे देखील आवश्यक आहे. अशा रुग्णांसाठी फक्त तीन आसने सांगत आहोत, ही आसने नियमित केल्याने लाभ मिळतो.
 
1. दंडासन- भिंतीला पाठ लावून बसा,कुल्ह्यांना भिंतीशी पूर्णपणे स्पर्श करा. गुडघे आणि पाय सरळ करून बसा. योगा बेल्टच्या मदतीने पायाची बोटे आपल्या दिशेने खेचा. हे आसन दहा ते पंधरा मिनिटे करा, जर आपणांस मध्येच थकवा जाणवत असेल तर तुमचे पाय सैल सोडा.
 
2. पादांगुठासन- पलंगावर किंवा जमिनीवर झोपा आणि दोन्ही पाय सरळ करा. दोन्ही पाय आपल्याकडे खेचा. योगा बेल्टच्या मदतीने पाय सरळ वर करा. गुडघा सरळ ठेवा आणि पायाचा पंजा आपल्याकडे खेचा. साधारण एक ते तीन मिनिटे आसन त्याच स्थितीत ठेवा. आसन करताना आपला श्वास रोखू नका.
 
3. पद्मासन- हे आसन बसून केले जाते. सर्वप्रथम पाय लांब करून आपसात चिकटवून ठेवा, नंतर डाव्या हाताने उजवा पायाचा अंगठा धरून उजवा पाय डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा. मग डावा पाय वरील उजव्या मांडीवर ठेवा. मग दोन्ही हातांचे मनगट सरळ करून  गुडघ्यांवर ठेवा. दोन्ही हात अंगठ्याजवळ जोडा, इतर तीन बोटे सरळ ठेवा. डोळे बंद करा आणि पाठीचा कणा सरळ ठेवा. मान सरळ आणि नाकाच्या टोकावर दृष्टी ठेवा किंवा कपाळावर मन एकाग्र करा. त्याला पद्मासन म्हणतात, सर्व वाईट भावनांचा नाश करणारा हे आसन आहे.