suvichar

या दिवशीबकरी ईद म्हणजे काय बकरीला बळी का देतात?

Updated: मंगळवार, 27 जून 2023 (10:18 IST)
 
ईद-अल-अधा’
याला ‘बकरी ईद’ किंवा ‘त्यागाचा सण’ असे संबोधले जाते. यामागे देखील एक कथा सांगितली जाते.
अल्लाहने ‘हजरत ईब्राहीम’कडे त्याच्या मुलाचा बळी मागितला. तेव्हा क्षणाचाही विचार नं करता आपल्या मुलाची हत्या करण्यासाठी ईब्राहीम पुढे सरसावताच अल्लाहने ‘इसहाक’च्या (ईब्राहीमचा मुलगा) जागी ‘बकरी’ प्रकट केली आणि ईब्राहीमला सांगितले की“तुझी माझ्यावरची निष्ठा पडताळण्यासाठी मी तुझी कसोटी घेतली आणि त्यात तू यशस्वी देखील झालास.”
 
‘ईद-अल-अधा’या इस्लामिक कॅलेंडरमधील बाराव्या आणि अंतिम महिन्याच्या 10 व्या दिवशी ‘ईद-अल-अधा’चा दिवस येतो.
या दरम्यान मुस्लीम बांधव कोणताही उपवास करत नाही. या महिन्यात ‘हज्ज यात्रे’चे आयोजन मोठ्या प्रमाणवर केले जाते.
 
त्याग आणि समर्पणाचे प्रतिक म्हणजे ‘ईद-अल-अधा’होय. ही ईद अडीच दिवस साजरी केली जाते. या दिवशी मुस्लीम बांधव ‘बकरी किंवा बोकड’अल्लाहला समर्पित करतात. यातून मिळणाऱ्या मटणाचे तीन भाग केले जातात. पहिला भाग हा कुटुंबियांसाठी असतो, दुसरा भाग नातेवाईक व मित्रमंडळींमध्ये वाटला जातो. शेवटचा, तिसरा भाग अन्नासाठी भुकेलेल्या गरिबांना दिला जातो.
 
‘कुराण’सर्वांनाच समर्पण करण्याची सक्ती करत नाही, ज्यांना शक्य आहे त्यांनीच बकरी किंवा बोकडाचा बळी द्यावा आणि मिळणारे मटण गरिबांसोबत वाटून खावे असे ‘कुराणा’त सांगितले आहे.
 
बकरी ईद दिवशी *_
‘बकरी ईद’दिवशी मुस्लिम नागरिकांच्या घरी काही चौपाया जनावरांची खास करून बकऱ्यांची कुर्बानी देण्याची प्रथा आहे. कुर्बानी दिल्यानंतर ते मांस समान तीन हिश्शांमध्ये गोरगरिबांना व अनाथ, आप्त व नातेवाईकांना वाटप केले जाते. तसेच रंगीबेरंगी नवीन कपडे, सुगंधी दरवळ, खमंग आणि चमचमीत पदार्थ आणि एकमेकांना ईद मुबारक असे म्हणत अलिंगन देत शुभेच्छा देत असे. तर या दिवशी पाहुण्यांच्या गर्दीने प्रत्येक मुस्लिम बांधवाच्या घरातील वातावरण उत्साहाचे असते.
Edited by : Ratnadeep Ranshoor
 

सर्व पहा

गौरी पूजनात ऐनवेळी मासिक पाळी आली तर काय करावे? जाणून घ्या धार्मिक नियम, पर्याय आणि आरोग्य!

ज्येष्ठा गौरी: महानैवेद्याच्या ताटाची मांडणी व वाढण्याची पद्धत

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

Vishwakarma Jayanti 2026 Wishes in Marathi विश्वकर्मा जयंती शुभेच्छा मराठी

Gauri Geete in Marathi गौरी गणपतीची गाणी

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments