रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. मुस्लिम
  3. मुस्लिम धर्माविषयी
Written By
Last Updated : शुक्रवार, 31 जुलै 2020 (09:34 IST)

जाणून घ्या बकरी ईदच्या दिवशी का दिली जाते कुर्बानी

मुस्लिम समुदायाचे लोक रमजान संपल्यावर किमान 70 दिवसांनंतर बकरी ईदचा सण साजरा करतात. याला ईद-उल-जुहा देखील म्हणतात. ईद-उल-फितर (मिठी ईद) नंतर मुस्लिम समुदायाच्या सर्वात मोठ्या सणांमध्ये एक आहे बकरी ईद. या दिवशी मुसलमान लोकांच्या घरी काही चौपाया जनावरांची खास करून बकर्‍याची कुर्बानी देण्याची प्रथा आहे. कुर्बानी दिल्यानंतर मांस समान तीन हिश्शांमध्ये गोरगरीब व अनाथ, आप्त व नातेवाईक आणि स्वत: व शेजारी यांना वाटप करावे लागते  तर जाणून घेऊ ईद-उल-जुहाच्या दिवशी का दिली जाते कुर्बानी –
 
हजरत इब्राहिम यांनी सुरू केली परंपरा
इस्लाम धर्माचे प्रमुख पैगंबरांमध्ये हजरत इब्राहिम हे एक होते. यांच्यामुळेच कुर्बानी देण्याची परंपरा सुरू झाली.
 
अल्लाहची आज्ञा
असे मानले जाते की परमश्रेष्ठ अल्लाहने हजरत इब्राहिम (प्रेषित) यांच्या स्वप्नात येऊन पुत्र इस्माइल (प्रेषित) याचे बलिदान दे, अशी आज्ञा केली होती. सलग तीन दिवस त्यांना स्वप्नात आपला मुलगा इस्माइल यांना बळी देण्याविषयी ईशआज्ञा होत होती. त्यांना म्हातारपणी जाऊन अब्‍बा बनण्याचा आनंद मिळाला होता. पण अल्लाहच्या अज्ञापुढे ते आपला आनंद कुर्बान करण्यास तयार होते.
 
अल्लाहने केला हा चमत्कार
अल्लाहच्या आज्ञापुढे कोणाचे काय चालते. ते असे झाले की इब्राहिम आपल्या मुलाला कुर्बान करण्यासाठी घेऊन जात होते तेव्हा रस्त्यात त्यांना एक सैतान मिळाला आणि तो म्हणून लागला तू का या वयात तो आपल्या मुलाला का कुर्बान करत आहे? सैतानाची गोष्ट एकूण त्यांचे मन देखील थोडेसे   विचलित झाले आणि ते विचार करू लागले. पण काही वेळेनंतर त्यांना अल्लाहशी केलेला वचन  आठवले.
 
डोळ्यावर बांधली पट्टी
परमेश्वरावरील असीम भक्ती व प्रेमासाठी त्यांनी आपल्या एकुलत्या एक व उतरत्या वयात झालेल्या पुत्रास परमेश्वरासाठी बळी देण्याचे ठरवले. यासाठी पत्नी हाजरा व पुत्र इस्माइल यांनीही त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे ठरवले. बलिदानावेळी पुत्रप्रेम आडवे येऊन परमेश्वर कर्तव्यात अडसर येऊ नये यासाठी पुत्र इस्माइल यांनी वडिलांना डोळ्यावर पट्टी बांधण्यास सुचवले. मक्काच्या पर्वतराजीमध्ये एका मोठ्या शीळेवर पुत्राचा बळी देण्यासाठी त्यांनी पुत्राच्या गळ्यावर सुरी चालवली. परमश्रेष्ठ अल्लाह या भक्तीने स्तिमित व प्रसन्न झाले व पुत्राच्या ठिकाणी त्यांनी देवदूताकरवी एका बोकडास अवतरीत केले. याच प्रसंगास अनुसरून परमेश्वरभक्ती, परमेश्वर प्रेमापोटी बलिदानाचे एक प्रतीक म्हणून 'ईल-उल-जुहा' साजरी करण्याची प्रथा पडली.
 
सैतानाला कंकर मारण्याची प्रथा आहे
हजच्या दरम्यान याच ठिकाणी सैतानास हाजी लक कंकर (दगडाचे लहान तुकडे) मारण्याचे कर्तव्य पार पाडतात, हाही हज यात्रेचा एक कार्यभाग (अरकान) आहे. 'ईद-उल-जुहा'च्या अनुषंगाने प्रत्येक पित्यास त्यांच्या पुत्रापोटी परमेश्वरास बळी देऊन बकरी किंवा उंटाचे मांस समान तीन हिश्शांमध्ये गोरगरीब व अनाथ, आप्त व नातेवाईक आणि स्वत: व शेजारी यांना वाटप करावे लागते व त्यांनाही या सणाच्या निमित्ताने मित्रांसह सामिष मांसाहारी जेवणाची संधी मिळते.