रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. ख्रिश्चन
  3. ख्रिश्चन धर्माविषयी
Written By
Last Updated : शुक्रवार, 7 एप्रिल 2023 (07:50 IST)

Good Friday : येशू ख्रिस्ताच्या मृत्यूदिनाला गुड फ्रायडे का म्हणतात

ख्रिश्चन लोकांमध्ये गुड फ्रायडे आणि इस्टर संडे हे दोन दिवस पवित्र मानले जाते. ईस्टरच्या आधील शुक्रवारी गुड फ्रायडे हा सण पाळला जातो. ख्र्सिस्ती धर्मातील समजुतीप्रमाणे या दिवशी येशू ख्रिस्ताला क्रॉसवर चढवण्यात आले. याची आठवण ठेवून ख्रिस्ती जगात हा दिवस शोकदिवस म्हणून मानला जातो. काही ख्रिस्ती पारंपारिक देशांमध्ये राष्ट्रीय दु:खवट्याप्रमाणे साजरा होतो. या दिवशी कोणत्याही आनंदायक कार्यक्रम साजरा करण्यात येत नाहीत. काही भाविक लोक चर्च मध्ये जाउन येशूने केलेल्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.
 
गुडफ्रायडे का म्हणतात
गुड फ्रायडेच्या दिवशी प्रभु येशूवर करण्यात आलेले अत्याचार बघत हा दिवस आनंदाचा मानला जात नाही. तरी याला गुड फ्रायडे म्हणतात कारण ख्रिश्चन समाजाप्रमाणे प्रभु येशू ख्रिस्त हे देवाचा पुत्र होते. ते लोकांचं भलं करण्यासाठी, त्यांचं अज्ञान दूर करण्यासाठी आणि प्रेम पसविण्यासाठी या पृथ्वीवर आले होते. जेव्हा येशू ख्रिस्तांवर अनेक अत्याचार केले गेले व त्यांना वधस्तभांवर खिळविण्यात आले तेव्हा त्यांनी देवाला प्रार्थना केली की यांना माफ करा, कारण, यांना नाही माहित की हे काय करत आहेत. 
 
शुक्रवारच्या दिवशी येशू यांना क्रॉसवर लटकवण्यात आले होते, त्या दिवशी शुक्रवार गुड फ्रायडे म्हटला जातो कारण यात येशू यांचा त्याग, प्रेम, दया, महानतेचे दर्शन होतं. गुड फ्रायडेला गुड यासाठी म्हटलं जातं की येशूच्या त्यागामुळे मानवजात पाप व दंड मुक्त झाली. मृत्यूंनतर पुन्हा जीवन धारण करण्यामागील संदेश देखील हाच होता की मी नेहमी तुमच्यासोबत असून तुमचं भलं व्हावा हेच इच्छितो. येथे गुड म्हणजे इंग्रजीत हॉली अर्थात पवित्र असे आहे. म्हणून याला या दिवसाला हॉली डे, ग्रेट फ्रायडे आणि ब्लॅक डे असेही म्हणतात. 
 
या दिवशी काय करतात
गुड फ्रायडेला चर्च व घरात सजावट करत नाही. या ‍दिवशी येशूच्या शेवटल्या सात वाक्यांचे पाठ केलं जातं. या दिवशी लोक चर्चमध्ये जाऊन प्रभू येशूचं स्मरण करतात. अनेक लोक काळे कपडे परिधान करुन शोक व्यक्त करतात. या ‍दिवशी पदयात्राही काढली जाते. गुडफ्रायडेच्या दिवशी मेणबत्ती जाळत नाही तसंच घंटीही वाजवली जात नाही. अनेक लोक या दिवशी सामज सेवा करतात, दान करतात. 
 
40 दिवसांपूर्वीच सुरु होतात उपास
अनेक लोकं त्यागाबद्दल येशूचे आभार मानत 40 दिवसांपूर्वीपासून उपास करण्यास सुरु करतात ज्याला लेंट असे म्हणतात. काही लोक केवळ शुक्रवारी उपास करतात. गुडफ्रायडेच्या दिवशी भक्त प्रार्थना व दान करतात. 
 
यानंतर पवित्र दिवस येतो तो म्हणजे ईस्टर संडे. मान्यतेनुसार तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी येशू पुन्हा जिवंत झाले. नंतर त्यांनी आपल्या अनुयायांसोबत 40 दिवस वेळ घालवत उपदेश दिले. येशूच्या पुनःजीवित झाल्यामुळे हा दिवस ईस्टर संडे म्हणून साजरा केला जातो.