शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. ख्रिश्चन
  3. ख्रिश्चन धर्माविषयी
Written By
Last Modified: रविवार, 9 एप्रिल 2023 (10:28 IST)

Easter Day 2023 : येशू ख्रिस्त यांचे अमूल्य विचार

Jesus Christ Story
येशू ख्रिस्त यांनी केलेल्या भविष्यवाणी प्रमाणे जीवनातील मूल्यांमध्ये प्रत्येक नैसर्गिक संरचनेसाठी प्रेमसंबंधांचा उल्लेख केला आहे. परंतु या 4 मुख्य गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
 
* जीवनावर पूर्ण विश्वास असावा. जो पर्यंत स्वतःवर आणि निसर्गावर विश्वास होतं नाही तो पर्यंत अस्तित्वाला संकटातून बाहेर मानले जाऊ शकत नाही. सर्व धर्मात या आवश्यकतेला ठळकपणे नमूद केले आहे.
 
*  ज्या प्रकारे स्वतःवर प्रेम करता त्याच प्रकारे सर्वांवर प्रेम केले पाहिजे. या संदर्भात 'शेजारी' असा उल्लेख केल्याचा अर्थ असा असावा की कुटुंबानंतर जर आयुष्यात पहिले व्यवहार ज्याच्याशी होतात ते शेजारी आहे. आयुष्यात प्रेम हे स्वतः पासून सुरू होऊन बाहेरच्या जगात पसरले तर अस्तित्वाची असण्याची सत्यता अधिक दृढ होते.
 
* शत्रूंशी प्रेम आणि दुःख देणाऱ्यांशी आपुलकीने वागणे. या तिसऱ्या जीवन मूल्याचे हेतू अगदी स्पष्ट आहे की अशा प्रकारे हिंसेचा परिणाम कमी होते आणि आयुष्याची सुरक्षा वाढते, कारण हिंसाचाराचे निराकरण हिंसाचाराने करणे असे आहे जसे की आग विझविण्यासाठी पेट्रोलचा वापर करणे.
 
*  चवथा आणि शेवटचा संदेश ख्रिश्चिन धर्माचेच नव्हे तर हिंदू धर्मात देखील प्रामुख्याने नमूद केले आहे की 'जसे कराल तसे फेडाल' स्वामी विवेकानंद यांच्या शब्दात 'फक्त तोच व्यक्ती सर्वांपेक्षा योग्य प्रकारे कार्य करतो जो पूर्णपणे निःस्वार्थी आहे'.
 
Edited By - Priya Dixit