बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. मुस्लिम
  3. मुस्लिम धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 20 जुलै 2021 (17:18 IST)

बकरीद 2021: ईद-उल-अजहा साजरा करण्यापूर्वी बलिदानाचे काही नियम जाणून घ्या

ईद-उल-अजहा किंवा बकरीद चा सण बुधवार 21 जुलै 2021 रोजी साजरा केला जाईल. ईद-उल-अजहा पैगंबर हजरत इब्राहीम अलेहिस्सलाम द्वारा अल्लाहच्या सांगण्यावरून आपल्या मुलगा हजरत इस्माईल अलैय सलाम यांच्या बलिदानाची आठवण करतो. इस्लाममध्ये ईद-उल-जुहावर बलिदान देण्याचेही काही नियम आहेत, जे प्रत्येक मुस्लिमांना पाळणे आवश्यक मानले जाते. चला त्या बलिदानाचे 5 खास नियम जाणून घ्या-
 
1. फक्त हलाल पैशातून म्हणजेच कायदेशीर मार्गाने मिळवलेल्या पैशाने कुर्बानी दिली जाऊ शकते.
2. ईद-उल-जुहाच्या दिवशी बकरी, मेंढ्या, उंट आणि म्हशीची कुर्बानी दिली जाते. 
3. बलिदान देण्याच्या वेळी जनावराला कोणत्याही प्रकारची दुखापत वा आजार नसावा, तो पूर्णपणे निरोगी असावा, कारण इस्लाममध्ये अशा प्राण्यांचा बळी देण्याची परवानगी नाही.
4. बळी देताना किबला रुखावर झोपून दुआ करुन बळी द्यायची असते.
5. बळीचे मांस तीन समान भागामध्ये विभागले गेले पाहिजे, त्यातील 1 स्वतःच्या घरासाठी, 2 नातेवाईक आणि मित्रांसाठी आणि 3 गरिबांसाठी असावे.