1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. अधिकमास
Written By

Adhikmaas 2023 अधिकमासात काय दान करावे?

Adhikmaas 2023 Daan शास्त्रांप्रमाणे मलमासाला विशेष महत्तव आहे. याला अधिकमास किंवा पुरुषोत्तम मास या नावाने देखील ओळखले जाते. हा महिना प्रभू विष्णूंना समर्पित आहे. या महिन्यात काही वस्तू दान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते तर जाणून घ्या कोणत्या वस्तू दान केल्याने पुण्य लाभेल- 
 
पुस्तकं - पुरुषोत्तम महिन्यात गरजू लोकांना पुस्तकांचे दान करावे. असे केल्याने सरस्वती देवीची कृपा होते आणि ज्ञान या क्षेत्रात वृद्धीत होते.
 
दीपदान - शास्त्रांप्रमाणे अधिकमास दरम्यान दीप दान करण्याचे विशेष महत्तव आहे. दीपदान केल्याने व्यक्तीच्या जीवनातील अंधार दूर होऊन जीवन उजळतं. म्हणून मलमासात घरात आणि मंदिरात दिवे लावावे.
 
नारळ - नारळाचा संबंध देवी लक्ष्मीची आहे. म्हणून मलमासात नारळाचे दान करावे. याने जीवनात सुख-समृद्धी नांदते आणि देवी लक्ष्मीची कृपा राहते. जीवनात कधीही धन-धान्याची कमी भासत नाही.
 
पिवळे वस्त्र - पुरुषोत्तम मासात पिवळ्या रंगाचे वस्त्र दान केल्याने विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो. असे केल्याने जीवनात सकारात्मकता येते आणि आर्थिक स्थिती चांगली राहते.
 
भोजन - मलमलासात अन्न दानाचे खूप महत्तव आहे. याने अक्षय पुण्य प्राप्ती होते. याने देवी लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णा प्रसन्न होऊन आशीर्वाद देते. घरात धन-धान्य भरलेलं राहतं. पुरुषोत्तम मासात कधीही भोजन दान करु शकता. आपण केळी देखील दान करु शकता. केळी दान केल्याने घरात सकारात्मकता येते. सोबतच कुटुंबातील लोकांमध्ये प्रेम वाढतं.