PAK vs AFG Asia Cup 2022: टीम इंडिया आशिया कपमधून बाहेर, आता अंतिम सामना पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात होणार!
आशिया चषक स्पर्धेत बुधवारी (7 सप्टेंबर) झालेल्या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा पराभव केला. पाकिस्तानच्या विजयामुळे टीम इंडियाचे आशिया कप 2022मध्ये पोहोचण्याचे स्वप्न भंगले आहे. आता 11 सप्टेंबरला होणाऱ्या अंतिम सामन्यात पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सामना होणार आहे.
टीम इंडिया आशिया कप 2022 मधून बाहेर आहे. शारजाह येथे बुधवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा एका विकेटने पराभव केला. पाकिस्तानच्या विजयामुळे अफगाणिस्तान आणि भारत या दोघांचेही अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न भंगले आहे. आता दुबईत 11 सप्टेंबरला होणाऱ्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. सुपर फोरमध्ये अद्याप दोन सामने बाकी असले तरी दोन्ही संघांमध्ये अंतिम फेरी रंगणार आहे.
आता जर भारतीय संघाने दुबईत 8 सप्टेंबर रोजी खेळल्या जाणाऱ्या सुपर-फोरच्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानला पराभूत केले तर त्यांना केवळ दोन गुणांपर्यंत ल मारता येईल. म्हणजेच गुणांच्या बाबतीत भारत यापुढे पाकिस्तान आणि श्रीलंकेला कोणत्याही स्थितीत पराभूत करू शकत नाही. पाकिस्तान आणि श्रीलंकेचे प्रत्येकी चार गुण आहेत. 130 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने पहिल्याच षटकातच कर्णधार बाबर आझमची विकेट गमावली.
यानंतर 50 धावांच्या आतच पाकिस्तानने मोहम्मद रिझवान आणि फखर जमानचे विकेटही गमावले.पण इफ्तिखार अहमद आणि शादाब खान यांच्या 42 धावांच्या भागीदारीने पाकिस्तानचा डाव पुन्हा रुळावर आणला. शेवटच्या षटकात पाकिस्तानला 11 धावा करायच्या होत्या पण नसीम शाहने पहिल्या दोन चेंडूंवर षटकार मारून सामना संपवला.नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तान संघाला पुन्हा एकदा सलामीवीरांनी झटपट सुरुवात करून दिली.