Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मासिक राशीफल सप्टेंबर 2021

Updated: मंगळवार, 31 ऑगस्ट 2021 (23:43 IST)
 
कर्क 
उत्साह देणारा काळ राहिल. लहान सहान गोष्टीत अडकून राहू नका. परिस्थितीचा अभ्यास करूनच पुढे पाऊल टाका. मनातील इच्छा पूर्ण होतील. अनुभवाचा फायदा होईल. व्यापार, व्यवसायातील आवक साधारण राहिल. खर्च वाढेल. प्रॉपर्टी, खरेदी, विक्रीचे व्यवहार करताना सावध रहा. या महिन्यात अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. आरोग्य मध्यम राहील. वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. वाहने काळजीपूर्वक चालवा.
 
सिंह 
समस्याच्या मालिकांना तोंड द्यावे लागणार आहे. आर्थिक प्रकरणात मोठे नुकसान होण्याची शक्यता दर्शविते. आरोग्यविषयी चिंता सतावेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद होण्याची शक्यता संभवते. पत्नी व संततीपासून दु:ख होण्याची शक्यता संभवते. व्यापार-व्यवसाय सामान्य राहिल. विरोधकांना कमजोर समजण्याची चूक करू नका. महत्त्वरची कामे रखडतील. मानसिक क्रोध, चिडचिडपणावर नियंत्रण ठेवणे भाग पडेल. भावनाशील असल्यामुळे नुकसान होणे शक्य आहे.
 
कन्या 
प्रगतीचा आलेख उंचावून समाधान लाभेल. आशाच्या मदतीने निराशा हळूहळू कमी होईल. पुढे जाण्‍याच्या संधी मिळतील. संबंध सुधारतील. विरोधीक, शत्रुपक्ष थंड पडतील. अचूक निर्णय घेऊ शकाल. चुकीची जाणीव होईल. नव विचार, उत्साह प्रगती साधण्यास फायदेशीर ठरेल. व्यापार, व्यवसायात प्रगती साधाल. या महिन्यात कुटुंबियांबरोबर वार्तालाप केल्याने एकमेकांच्या गरजा समजण्यात मदत मिळेल. एखाद्या विशिष्ट योजनेला हातावेगळे करण्यात बराच वेळ जाईल.
 
तूळ 
प्रगती मिळवून देणारा काळ आहे. अथक परिश्रम घ्यावे लागतील. महत्त्वाच्या कामात कोणावर विश्वास ठेवू नका. आळस टाळा. कुटूंबात वाद होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. कार्यात, यश, प्रतिष्ठा मिळेल. किमती वस्तू खरेदी करू शकाल. नोकरी, रोजगार बदलता येईल. तुम्हाला आपल्या इच्छेवर आणि मनस्थितीवर संयम ठेवावा लागणार आहे. कौटुंबिक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. आर्थिक पक्षाबाबत संपूर्ण महिना सावध राहावे लागणार आहे. 
 
वृश्चिक 
वेळेच भान ठेवावे लागेल. शांती, सहयोग, समाधानाने कार्य करावे लागेल. व्यापार-व्यवसाय नुकसान संभवते. गणपती बनवायला जात तर तेथे हनुमान बनेल, अर्थात कामे बिगडण्याची शक्यता आहे. जुनी वाद वाढण्याची शक्यता आहे. खरेदी, विक्रीचे व्यवहार सांभाळून करा. विरोधक वाढतील. स्वभावावर नियंत्रण राखावे लागले. कायद्याच्या चौकटीत राहून कामे करावे लागतील. काही प्रेमपूर्ण अनुभव या महिन्यात येऊ शकतात. हा वेळ आपल्या एखाद्या आवडीच्या व्यक्तीबरोबर घालवू शकता. आपल्या सर्जनशील व कलात्मक वैशिष्ट्यांना प्रेरणा मिळेल.
 
धनू 
अधिक उताविळपणा करू नका. तुमच्या विषयी असंतोष पसरेल. चिंता वाढेल. विचार कराल काही व होणार दुसरेच. व्यापारातील स्पर्धा टाळा. कर्ज काढू नका. खरेदी विक्रीच्या व्यवहारापासून सावध रहा. कटु अनुभव येणाचा संभव आहे. नुकसान झाले तर स्वत:चा तोल जाण्‍याची शक्यता नाकारारता येत नाही. इतर लोकांना आपल्या स्वतःची गरज व इच्छा सांगण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. आपल्या जुन्या लोकांना किंवा आधार देणार्‍या मित्रांना जोडणे या महिन्यात आपल्यासाठी फलदायी आहे.
 
मकर 
प्रगतीचा आलेख कासवगतीने वर चढेल. आवक चांगली होणार असल्याने खरेदी करू शकाल. मात्र व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी लागेल. कुटुंबातील वाद मिटतील. व्यापार-व्यवसायात यश येईल. नोकरीत मानाचे पद संभवते. स्वभावावाला औषध नाही असे म्हणातात पंरतू ते तुम्हाला शोधावे लागणार आहे. आपल्या सहकार्‍यांबरोबर झालेल्या मतभेदांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करा. हुशारीने गुंतवलेले धन आपणास ध्येयाजवळ घेऊन जाईल.
 
कुंभ  
अनुभव उपयोगी पडेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रगतीचा आलेख उंचावेल. उत्साह, आत्मविश्वास वाढेल. इच्छा पूर्ण होतील. व्यापार व्यवसायात यश मिळेल. आवक चांगली राहिल्याने गुंतवणूक करू शकाल. नोकरीत प्रमोशन मिळेल. कुटुंबात शुभ कार्य होईल. किमती वस्तू खरेदी करू शकाल. या महिन्यात आपल्या संपर्कात येणार्‍या लोकांच्या वर्तनामुळे आपणास संताप येण्याची शक्यता आहे. योग्य उद्योगात गुंतवणूक केल्यास शेवटी आर्थिक नफा मिळेल. 
 
मीन 
पूर्वी घेतलेल्या परिश्रमाचे फळ मिळेल. विरोधक अडचणी निर्माण करतील. कामाशी काम ठेवा. नवीन परिचय लाभप्रद. व्यापारातील अडचणी दूर होतील. नोकरीत बढतीचे योग. आवक वाढल्याने किमती वस्तुची खरेदी करू शकाल. कुटुंबात उत्साहाचे वातावरण राहिल.  सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. मान-सम्मान मिळेल. आपला दृढनिश्चय आणि आत्मविश्वास अधिक चांगल्या रीतीने कार्य करण्यास आपली मदत करेल. गंभीर आणि योजनाबद्ध प्रयत्नांनी आपणास यश आणि आनंद मिळेल. 

सर्व पहा

Deep Amavasya 2026 Wishes in Marathi दीप अमावस्येच्या शुभेच्छा

श्रावण सोमवारला कोणती फुले भगवान शिवांना अर्पण करू नयेत?

Mangalagaur Marathi Ukhane 2026 मंगळागौर पूजा मराठी उखाणे

लग्नानंतर पहिली मंगळागौर का साजरी करतात? जाणून घ्या परंपरेमागचे धार्मिक कारण

Jivati Puja 2026 Wishes in Marathi श्रावण शुक्रवार विशेष जरा जिवंतिका पूजनाच्या शुभेच्छा

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments