गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2021
Written By
Last Modified: सोमवार, 21 डिसेंबर 2020 (20:17 IST)

अंक ज्योतिष : मूलांक 5 भविष्यफळ 2021

मूलांक 5 आणि अंक शास्त्र भविष्य वर्ष 2021
मूलांक 5
जर आपले जन्माचे अंक 5, 14 किंवा 23 आहे तर आपला मूलांक 5 आहे ज्याचा राशीचा स्वामी बुध आहे. आणि तसेच वर्ष 2021 चा मूलांक देखील 5 आहे. आपण खूपच हुशार आणि समजूतदार व्यक्तिमत्त्वाचे आहात. कोणाकडून काम काढवणे आपल्याला चांगलेच माहीत आहे. आपण आपल्या कामाबद्दल खूप स्वार्थी असता. या 5  मूलांकाच्या लोकांमध्ये धैर्य, गतिशीलता आणि ऊर्जा असते. आपण आपल्या व्यवहाराने सर्वांचे मन जिंकता. आपल्याला भटकंतीची आणि खाण्या-पिण्याची फार आवड आहे. आपण एक चांगले विक्रेता बनू शकता कारण आपण समोरच्या व्यक्तीला आपल्या बोलण्यामुळे सहजरित्या भुलवून घेता. हे वर्ष आपल्या सर्व कामात यशाचे सूचक असेल आणि आपली सर्व थांबलेली कामे पूर्ण करेल.
 
करिअर साठी कसे असणार हे वर्ष 2021 : 
या मूलांकाचा स्वामी बुध ग्रह आहे आणि या 2021 ला जोडल्याने त्याचा मूलांक 5 होतो. त्याचा स्वामी देखील बुध आहे, हे व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर असेल. हे वर्ष आपल्यासाठी फायदेकारक ठरेल कारण या वर्षी आपले परिश्रम आणि नशीब दोघांची साथ लाभेल त्या मुळे आपण नवीन संधींसह यश संपादन कराल. या वर्षी नवे व्यवसाय सुरू करावयाचे असेल तर हे वर्ष आपल्याला यशाच्या पायऱ्या चढायला मदत करेल. हे वर्ष 2021 विदेशी संपर्कांसाठी फायदेशीर ठरेल. नोकरी करत असाल तर वर्षाच्या सुरुवातीला पदोन्नतीचे आणि बढतीचे चांगले योग बनत आहे आपण आपल्या अधिकाऱ्यांचा नजरेत प्रशंसेचे पात्र ठराल जे आपल्या उज्ज्वल भविष्याचे लक्षण दिसून येत आहे. जर आपल्याकडे नोकरी नाही तर या वर्षी मनाप्रमाणे नोकरी मिळेल.
 
आर्थिक दृष्ट्या कसे असणार हे वर्ष 2021 : 
या मूलांकासाठी हे वर्ष आर्थिक दृष्ट्या फायदेशीर आहे. या वर्षात आर्थिक उत्पन्नात वाढ आणि पगारवाढीचे चिन्हे दिसत आहे. या 2021 वर्षात आपले घराचे स्वप्न देखील पूर्ण होतील, जर आपल्याला एखाद्या कामासाठी किंवा गुंतवणुकीसाठी कर्ज घ्यावयाचे असेल तर वेळीच मिळेल. आपल्याला जुने पैसे घ्यावयाचे असेल तर एप्रिल नंतर जुने पैसे मिळतील. शेअर बाजारात दीर्घकाळाची गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. जमिनीत गुंतवणूक करावयाची असल्यास ऑगस्टच्यानंतरचा काळ चांगला असेल. या वर्षी आपण सहलीवर आणि करमणुकीवर पैसे खर्च कराल. एखाद्या महिलेच्या सांगण्यावरून पैसे खर्च करू नका असं केल्यानं तोट्या सह आपले नाव खराब होईल.
 
प्रेम संबंध आणि वैवाहिक जीवनासाठी कसे असणार हे वर्ष 2021 : 
या मूलांकाच्या लोकांसाठी हे 2021 चे वर्ष नात्यात गोडवा घेऊन येईल आणि नवी नाते जोडण्यासाठी हे वर्ष शुभ आहे. या वर्षात आपण आपल्या कुटुंबात आणि आपल्या कामाशी सुसंगत राहण्याचा प्रयत्न कराल. ज्यामुळे आपले संबंध सुधारतील. आपण प्रेम प्रकरणात असाल तर त्याच्यासह प्रेमाचे चांगले क्षण घालवाल ज्यामुळे आपल्यातील प्रेम वाढेल. विवाहित लोकांसाठी हे वर्ष काही आनंदाची बातमी घेऊन येणारे आहे. आपण जोडीदारासह बाहेर फिरायला जाऊ शकता. मे नंतर आपले लक्ष बाहेर कुठे आकर्षित होईल, या साठी आपण सावधगिरी बाळगा. वर्षाच्या अखेरी आपले मतभेद जोडीदाराशी होऊ शकतात पण आपण या परिस्थितीला लगेच हाताळून घ्याल.
 
आरोग्यासाठी कसे असणार हे वर्ष 2021 : 
या मूलांकासाठी हे वर्ष आरोग्याच्या दृष्टीने पूर्वीपेक्षा चांगले राहील. जर एखादे जुने आजार आपल्याला त्रास देत असेल तर त्याच्या कडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर औषधोपचार करा जेणे करून लवकर बरे व्हाल. जर आपल्याला रक्तवाहिन्यांशी किंवा त्वचेचे काही त्रास असल्यास त्वरितच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जेणे करून समस्यांचे निराकरण वेळेवर करता येईल. जूनच्या नंतर च्या काळात आपल्या निष्काळजीपणाने आणि चुकीच्या खाण्या-पिण्याने घशात आणि पोटात संक्रमण होऊ शकतो ज्यामुळे आपले त्रास वाढतील. या वर्षी 2021 मध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये पोटाच्या काही तक्रारीमुळे पैसे खर्च होतील.