गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2021
Written By
Last Modified: सोमवार, 21 डिसेंबर 2020 (15:00 IST)

अंक ज्योतिष : मूलांक 4 भविष्यफळ 2021

मूलांक 4 आणि अंक शास्त्र भविष्य वर्ष 2021
मूलांक 4
जर आपला जन्म 4, 13, किंवा 22 तारखेला झाला आहे तर आपला मूलांक 4 आहे. या मूलांकाचे स्वामी कलियुगातील मुख्य ग्रह राहू आहे. हा अंक अतिशय हुशार आणि मुत्सद्दी आहे असे लोकं आपले काम दुसऱ्यांकडून काढविण्यात तज्ज्ञ असतात. कायद्यांना कमी मानणारे आणि कायद्याला मोडणारे असतात. कोणाशीही लढायचे असल्यास अगदी हुशारीने सामोरी जातात. आपली चूक कधीही मान्य करीत नाही. कोणत्याही कामाची सुरुवात करण्यासाठी अतिशय संघर्षाने पुढे वाढतात आणि अतिशय आवडीने ते काम पूर्ण करतात. या वर्षाचे मूलांक 5 आहे. ज्याचा स्वामी बुध आहे. या मुळे आपले डोकं पूर्वीपेक्षा अधिक हुशारीने चालेल. आपण स्वतःपुढे कोणालाच काही समजणार नाही.
 
करिअर साठी कसे असणार हे वर्ष 2021 : 
मूलांक 4 च्या लोकांसाठी हे वर्ष 2021 व्यवसायाच्या दृष्टीने खूप चांगले जाणार आहे. कारण या वर्षाचे मूलांक 5 आपल्या बुद्धीला आणि युक्त्यांना उद्यमानं करेल आणि आपण लोकांचा आपल्या मुत्सद्दीपणाने फायदा घ्याल. हे वर्ष आपल्या साठी काहीही नवीन काम करण्यासाठी चांगले राहील. आपण नवीन योजनांवर काम कराल, त्यामध्ये आपल्याला यश मिळेल. त्यामुळे आपली नवीन ओळख बनेल. आपल्याला हुशारीने काम करण्याव्यतिरिक्त प्रामाणिकपणाने देखील काम केले पाहिजे. तेव्हाच आपण आपली ओळख बऱ्याच काळापर्यंत टिकवू शकाल. जर आपल्याला नोकरीत बदल हवे असेल, तर एप्रिल पासून वेळ चांगली आहे. वर्ष 2021 ऑगस्ट नंतरच्या काळात नोकरीत थोडी सावधगिरी बाळगावी लागेल.
 
आर्थिक दृष्ट्या कसे असणार हे वर्ष 2021 : 
हे वर्ष या मूलांकाच्या लोकांसाठी पैशांची सर्व स्वप्ने पूर्ण करणारे आहे. कारण या 4 मूलांकाच्या लबाडपणाला आता या वर्षाच्या मूलांक 5 ची साथ मिळणार आहे, जी या मूलांकाच्या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासह मिळणाऱ्या संधींमध्ये देखील फायदा मिळवून देईल. पण आपण जास्तीचे कर्ज घेऊन कोणालाही फसविण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा आपण त्या प्रकरणांमध्ये अडकाल आणि त्यामुळे आपली प्रतिमा देखील खराब होईल. आपल्याला या वर्षी शेअर बाजारात आणि लॉटरी मध्ये फायदा होईल. वर्षाच्या अखेरीस एखाद्या जमिनीत गुंतवणूक करणं फायदेशीर ठरेल किंवा एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळेल.
 
प्रेम संबंध आणि वैवाहिक जीवनासाठी कसे असणार हे वर्ष 2021 : 
हे वर्ष या मूलांकाच्या लोकांना आपल्या नात्यात सावधगिरी बाळगण्याचे सांगत आहे. कारण आपलं खोटं बोलणं आणि फसवेगिरी आपल्या नात्यासाठी हानिकारक असेल. आपला प्रिय व्यक्ती आपल्या खोट्या वागणुकीला आणि आपल्या फसवणुकीला ओळखेल आणि आपले फसवे प्रेम उघडकीस येतील. जर आपण एका नात्यात आहात तर दुसरे नाते जोडू नका अन्यथा पहिले नाते बिघडेल. विवाहित लोकांसाठी हे वर्ष अत्यंत भावनिक जाईल कारण वर्षाच्या सुरुवातीला आपल्यामुळे जोडीदाराशी दुरावा संभवतो, हा दुरावा आपल्याला भावनिक करेल आणि एकटेपणाची जाणीव करेल.
 
आरोग्यासाठी कसे असणार हे वर्ष 2021 :
हे वर्ष आरोग्याच्या दृष्टीने चढ-उतार आणेल कारण आपण आपल्या खाण्यापिण्याची काळजी घेणार नाही आणि बदलणाऱ्या ऋतूला सहन करू शकणार नाही. हेच कारण आपल्या आरोग्याला त्रासदायी ठरेल. आपल्याला आपल्या घशाची आणि छातीची काळजी घेतली पाहिजे, मादक पदार्थांपासून दूर राहावे. वर्षाच्या मध्य काळात वाहन अतिशय सावधगिरीने चालविण्याचा सल्ला देण्यात येत आहे कारण अपघात होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे. वर्षाच्या अखेर पोटात आणि घशात संक्रमण होण्याची शक्यता आहे  तर दुर्लक्ष  करू नका आणि निष्काळजीपणाने वागू नका.